असंख्य अडी-अडचणींवर मात करत अखेर राहुल बनला PSI; मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश

करिअरनामा ऑनलाईन । असंख्य विद्यार्थी असतात जे अडीअडचणीवर मात करून यशाला गवसणी घालतात. असाच एक लढवय्या आहे ज्याने कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, नोकरी करतानाच अडचणीवर मात करीत राहुल जाधवने अखेर आपल्या ध्येयाला गवसणी घातली. पहिल्याच प्रयत्नात खात्याअंतर्गत त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे आहे. अंबाजोगाईच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले राहुल ज्ञानोबा जाधव हे मूळचे लातूरचे आहेत.

राहुल यांचे वडील खासगी वाहनावर चालकाची नोकरी करत. राहुलचे शिक्षण लातूरच्याच विविध शाळेत झाले. सुरुवापासूनच त्याने पोलिस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगले होते. परंतु घरची परिस्थिती बेताचीच असल्याने राहुलला नोकरी करण्याची गरज होती. उच्च माध्यमिक शिक्षण होताच वयाच्या २१ व्या वर्षी ते पोलिस दलात भरती झाले. त्यांनी (२०१६) मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात (२०१५) त्यांचे लग्नही झाले. त्यामुळे संसाराचा गाडा चालवत त्यांना हे ध्येय गाठायचे होते. नोकरी करतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेत तयारी सुरु केली.

सकारात्मक ऊर्जा सोबत ठेऊन त्यांनी २०१७ ची पूर्व व मुख्य परीक्षा उत्साहाने दिली. तीन वर्षांनंतर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात राज्यातून ६८ वा क्रमांक मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरले. सकारात्मक विचार व नियोजनबद्ध अभ्यासच हमखास यश मिळवून देते. राहुल जाधव सारखे जिद्द व चिकाटी अंगी बाळगणारे युवक निश्चितच अधिकारी पदावर पोचू शकतात. त्याचा हा प्रवासच २०२१ मध्ये येऊ घातलेल्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना अधिक प्रेरणादायी ठरणारा आहे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com