MIDC मधील कर्मचाऱ्याच्या मुलाने घडवला इतिहास! MPSC परीक्षेत राज्यात पहिला येऊन बनला उपजिल्हाधिकारी…

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक जिद्दीच्या जोरावर यशाला खेचून आणतात. अशाच जिद्दीच्या जोरावर MIDC मधील कर्मचाऱ्याच्या मुलाने MPSC मधुन राज्यात पाहिला येऊन यश खेचून आणले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतून सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौघुले याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आणि आई वडिलांच्या कष्टांचे मोठे चीज केले.

राज्यात पहिले येऊन उपजिल्हाधिकारी झालेल्या प्रसाद चौघुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनीरिंगची पदवी कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून घेतली आहे. लहानपणापासूनच हुशार असलेल्या प्रसादचे शालेय शिक्षण सातारा येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयातून झाले. प्रसादचे वडील शहापूर MIDC मध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात. तर, आई हाऊस वाईफ आहे. २०१७ साली कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून इंजिनीरिंग झाल्यानंतर प्रसादाने पुणे येथे कंपनीत एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर आपण अधिकारीच व्हायचे असे मनात ठरवून त्याने १ वर्ष नोकरी केल्यानंतर राजीनामा दिला. व पूर्णवेळ MPSC परीक्षेचा अभ्यास करायला सुरवात केली.

या मोठ्या यशानंतर प्रसाद म्हणतो की, ‘आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे चीज झाले. माझे वडील विद्युत विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१७ मध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. त्यानंतर एक वर्ष पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करत होतो. त्यासोबतच राज्यसेवेची तयारीही करत होतो. सहज म्हणून एक प्रयत्नही केला होता. त्यात यश आले नाही. मग पूर्णतयारीनिशी २०१९ची परीक्षा दिली. परीक्षेसाठी पूर्ण वर्षांचे नियोजन करून अभ्यास केला. मुलाखतीच्या तयारीसाठी खासगी शिकवणी लावली होती. आता पुढे जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची तयारी करण्याचा मानस आहे’. प्रसादला करिअरनामा कडून भविष्यातील प्रवासाकरिता खूप खूप शुभेच्छा…

 

हे पण वाचा -
1 of 40

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp 

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com