शारीरिक अपंगत्वावर मात करत संतोष यांनी मिळविली P.hD; होत आहे सर्व स्थरातून कौतुक

करियरनामा ऑनलाईन । शारीरिक अपंगत्व अथवा कोणतेही अपंगत्व असलेले तरी बऱ्याच वेळा अनेक विद्यार्थी असतात खचत जातात. काही विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहून जाते. तर काही विद्यार्थी ठराविक शिक्षणानंतर त्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम देत असतात. पण, महावितरणमध्ये कामाला असलेल्या एका लिपिकाने आपल्या जिद्दीचीचे आणि शिक्षणाच्या आवडीचे दर्शन समाजाला दाखवले आहे. त्यांनी मराठी विषयांमध्ये पीएचडी मिळवली आहे.

महावितरणमध्ये ‘लिपिक’ या पदावर कार्यरत झाल्यानंतर संतोष कानडे यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. ते नेहमी शिकत राहिले. त्यांनी मराठी विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर, त्या विषयांमध्ये नेट आणि सेट परीक्षा पास केली. यासोबतच, त्यांनी सीबीएससीची सीईटी आणि राज्याची टीईटी परीक्षाही पास केल्या.

आपल्या विषयांमध्ये विविध पदव्या आणि परीक्षा त्यांनी पास केल्यानंतर येव्हड्यावरच न थांबता त्यांनी पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. ‘संत साहित्य’ या विषयांवर त्यांनी एचडी मिळवली आहे. या विषयांमध्ये पीएचडी मिळवत असताना त्यांनी स्वतःचे चार पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. शिक्षणाप्रती असलेली जिद्द आणि चिकाटीसोबत कष्ट घेण्याची प्रवृत्तीमुळे समाजात एक सकारात्मक संदेश त्यांनी दिला आहे. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी या प्रयत्नातून जगाला दाखवून दिल्यामुळे त्यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.