Parag Agrawal Success Story: भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला फायदा; IIT इंजिनियर ते Twitter चा CEO

करिअरनामा ऑनलाईन | एक दशकापूर्वी आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) मधून पदवी घेतलेला इंजिनियर आता जगातील महत्त्वाच्या टेक कंपनीचा CEO बनला आहे. त्या तरुणाचं नाव आहे पराग अग्रवाल… (Parag Agrawal Success Story) यांची नियुक्ती अनेकांसाठी आश्चर्याचा धक्काच होती. अर्थात ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांच्या मते मात्र पराग अग्रवाल हे कंपनीच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात सहभागी होते. इतकेच नव्हे तर ट्विटर (Twitter) ही कंपनी आजच्या इतकी मोठी नसल्यापासून ते यामध्ये कार्यरत आहेत. एक भारतीय इंजिनियर ट्विटरचे सीईओ पद भूषवतो; हि बाब तमाम तरुणांमध्ये उत्साह निर्माण करणारी आहे. पराग यांच्यामुळे अमेरिकेला भारतीय टॅलेंटचा फायदा झाला आहे हे निश्चित. जाणून घेऊया त्यांच्या यशाची घोडदौड…

पराग यांचे ट्विटरमधील पदार्पण –
पराग अग्रवाल यांनी ऑक्टोबर ११ वर्षांपूर्वी ट्विटरमधील आपला प्रवास सुरू केला होता. पराग यांनी स्टॅनफोर्ड येथून PHD मिळवल्यानंतर मायक्रोसॉफ्ट, AT&T आणि याहू या कंपन्यांमध्ये काम केले होते. ट्विटरमध्ये पराग इंजिनियर म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर वरची पदे मिळवण्यास सुरूवात केली. २०१७ मध्ये पराग अग्रवाल यांची नियुक्ती ट्विटरचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून झाली.

थोडक्यात महत्वाचं –

  • पराग अग्रवाल ट्विटरचे नवे CEO.
  • पराग अग्रवाल यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये ट्विटरमधील आपला प्रवास सुरू केला.
  • ट्विटरमध्ये त्यांनी मशीन लर्निंग, महसूल आणि इंजिनियरिंगवर काम केले.

पराग यांची दहा वर्षांची कारकिर्द – (Parag Agrawal Success Story)
पराग अग्रवाल यांनी ऑक्टोबर २०११ ट्विटरमधील आपला प्रवास सुरू केला होता. पराग यांनी स्टॅनफोर्ड येथून पीचएडी मिळवल्यानंतर मायक्रोसॉफ्ट, AT&T आणि याहू या कंपन्यांमध्ये काम केले होते. ट्विटरमध्ये पराग इंजिनियर म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर वरची पदे मिळवण्यास सुरूवात केली. सहा वर्षांनी २०१७ मध्ये पराग अग्रवाल यांची नियुक्ती ट्विटरचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून झाली. ट्विटरच्या तांत्रिक बाबींमध्ये त्यांनी मुख्य लक्ष केंद्रित केले होते.

स्पर्धेत टिकण्यासाठी ट्विटरचा प्लॅन काय आहे?

३७ वर्षांचे पराग अग्रवाल तसे प्रसिद्धीपासून दूरच होते. ट्विटरमध्ये त्यांनी मशीन लर्निंग, महसूल आणि इंजिनियरिंगवर काम केले होते. मात्र आता त्यांच्यावर सीईओपदाची म्हणजे प्रशासकीय स्वरुपाची जबाबदारी देण्यात आली आहे. सीईओ म्हणून पराग यांना ब्लूस्काय या प्रकल्पांवर काम करावे लागणार आहे. जॅक डॉर्सी यांचा हा अत्यंत लाडका प्रकल्प आहे. यामुळे ट्विटरचे स्वरुपच बदलून जाणार आहे. ट्विटरने आपली नवीन क्रिप्टो टीमदेखील स्थापन केली आहे. सध्या जबाबदारी घेतल्यावर पराग यांना ट्विटरच्या तांत्रिक बाबींवर लक्ष द्यावे लागणार आहे. कारण तंत्रज्ञानाच्या पातळीवर ट्विटर हे आपले प्रतिस्पर्धी असणाऱ्या फेसबुक, युट्युबपेक्षा मागे पडले आहे. ट्विटरचे दररोज २० कोटी वापरकर्ते आहेत.

“ट्विटरची पूर्ण क्षमता जगाला दाखवून देणार” –

अग्रवाल यांनी जगाला ट्विटरची पूर्ण क्षमता दाखवण्याचे आश्वासन दिले आहे. सर्व जग आपल्याकडे सध्या पाहते आहे. याआधी कधीही जगाचे आपल्यावर एवढे लक्ष नव्हते. अनेक लोकांची अनेक मते आहेत. कारण अनेकांना ट्विटर आणि त्याच्या भवितव्याबद्दल काळजी वाटते. त्यामुळेच ट्विटरने त्याची पूर्ण क्षमता दाखवण्याची वेळ आली आहे, असे मत पराग अग्रवाल यांनी जॅक डॉर्सी यांनी राजीनाम्यासाठी लिहिलेल्या ईमेलला उत्तर देताना मांडले आहे. (Parag Agrawal Success Story)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com