यशोगाथा: हॉटेलमध्ये वेटर असलेले जय गणेश मेहनतीने बनले आयएएस अधिकारी; जाणून घ्या त्यांची संघर्ष कहाणी

करिअरनामा ऑनलाईन । अतिशय बिकट परिस्थितीतुन संघर्ष करून जर कोणी यश मिळवत असेल, तर त्या यशाला अधिक महत्व असते. असेच काही केले आहे तामिळनाडूतील के. जय गणेश यांनी. ते सहा वेळा नागरी सेवा परीक्षेस बसले आणि अयशस्वी झाले. परंतु कधीही आशा गमावली नाही. त्यांची सातवी परीक्षा ही शेवटची आशा होती आणि यावेळी नशिबाच्या नाण्याने काम केले. ते 156 व्या क्रमांकासह उत्तीर्ण झाले आणि त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. जय गणेश यांचा जन्म तामिळनाडूमधील उत्तर अंबरजवळील एका लहानशा गावातल्या एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करत असत आणि कुटुंबाचे भरणपोषण करत. जय गणेश नेहमीच आपल्या गावातील लोकांच्या दयनीय स्थितीबद्दल विचार करायचे. त्यांच्या गावातील लोक गरीब होते आणि त्यांना आपल्या खेड्यातील लोकांना मदत करायची होती.

जय गणेश लहानपणापासूनच हुशार होते. त्यांनी आपल्या खेड्यातील शाळेत आठवीपर्यंत शिक्षण घेतले आणि दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रवेश घेतला कारण तिथे सांगितले होते की आपण उत्तीर्ण होताच नोकरी मिळेल. तेथे त्यांनी 91 टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी तांथी पेरियार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. शिक्षण संपल्यानंतर त्यांना एका कंपनीत नोकरीही मिळाली, जिथे त्यांना महिन्याला 2500 रुपये पगार मिळायचा. या पगारामध्ये आपले कुटुंब चालवणे सोपे नसल्याचे जय गणेश यांना समजले. दुसरीकडे ते आयएएस होण्याचे स्वप्नसुद्धा पाहत होते,

त्यांनी 2500 रुपयांची नोकरी सोडून युपीएससीचा अभ्यास सुरू केला. जय गणेश यांनी हा मार्ग निवडला होता. परंतु, हा प्रवास करणे इतके सोपे नव्हते. ते सहा वेळा यूपीएससी परीक्षेत नापास झाले. त्याचवेळी त्यांच्यासमोर एक आर्थिक संकटही निर्माण झाले होते. जय गणेश यांनी अजूनही धीर सोडला नाही. त्यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करण्यास सुरवात केली. नोकरीवरून परत आल्यानंतर ते जो वेळे मिळाला त्या काळातच ते अभ्यास करायचे. जय गणेश यूपीएससी परीक्षेत नापास झाले होते. पण त्या दरम्यान त्याची इंटेलिजन्स ब्युरोच्या परीक्षेत निवड झाली. आपला संघर्ष थांबवून नोकरी करायची की, यूपीएससीची सातवी परीक्षा द्यायची हे ठरवणे त्यांना खूप अवघड होते. अखेरीस त्यांनी यूपीएससीची निवड केली आणि यावेळी त्यांनी कठोर परिश्रम केला आणि परीक्षेत त्यांनी 156 वा क्रमांक मिळविला. स्वत: वर विश्वास आणि सतत मेहनत केल्यामुळे त्यांनी यश संपादन केले.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com