UPSC Success Story : डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले; पण पहिल्याच प्रयत्नात बनली IAS

करिअरनामा ऑनलाईन। ‘जीवन म्हणजे अनिश्चितता’; असं मानणाऱ्या ऋषिताच्या आयुष्यात तिने जी काही कल्पना केली होती त्यापेक्षा वेगळंच घडत गेलं. पण आव्हानाला न घाबरणाऱ्या ऋषिताने आयुष्यातील प्रत्येक बदल स्वीकारला आणि त्याला समर्थपणे तोंड दिलं. जर तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची सवय असेल आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. हे सिध्द करून दाखवलंय दिल्लीच्या ऋषिता गुप्ताने. UPSC ची परीक्षा क्रॅक करून पाहिल्याच प्रयत्नात IAS अधिकारी होण्याचा इतिहास तिने रचलाय. तिची ध्येयवेडी जिद्द भावी अधिकाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल… (UPSC Success Story of IAS Rushita Gupta)

ऋषिताच्या शिक्षणातील चढ – उतार…

एका व्यावसायिक कुटुंबात वाढलेल्या ऋषिताच्या घरात सुरुवातीपासूनच शिक्षणासाठी पोषक वातावरण होते. ऋषिता नेहमीच अभ्यासात हुशार होती त्यामुळे तिला डॉक्टर व्हायचं होतं. दहावीनंतर विषयांची निवड करण्याची वेळ आली तेव्हा तिने कठीण समजल्या जाणाऱ्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित हे विषय निवडले. मात्र, याच दरम्यान तिच्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. याचा तिच्या अभ्यासावर बराच परिणाम झाला. त्यामुळे तिला हवे तेवढे गुण मिळाले नाहीत. ऋषिताला मेडिकल प्रवेशासाठी मेरिटप्रमाणे हवे तेवढे गुण मिळाले नव्हते. त्यामुळे तिला नाईलाजाने इंग्रजी साहित्यातून पदवीधर व्हावे लागले; हि खंत तिच्या मनात होती. या कठीण परिस्थितीत नैराश्य बाजूला ठेवून याचवेळी तिने UPSC मध्ये करिअर करण्याचा ध्यास घेतला.

पहिल्याच प्रयत्नात IAS होवून रचला इतिहास –

स्पर्धा परीक्षेच्या तयारी दरम्यान अनेक कसोट्या पार पदव्या लागतात. आपण बघतो, कि परीक्षेमध्ये सतत अपयश आल्याने विद्यार्थी खचून जातात. पण इथे ऋषिताच्या बाबतीत कमालच झालीय; ती अशी कि, ऋषिताने UPSC देण्याचा निर्णय घेतला… तीने परीक्षेची तयारी केली आणि पहिल्या प्रयत्नातच ती IAS ऑफिसर झाली. ऋषिताने IAS ची खुर्ची पटकावून एक इतिहासच रचला आहे.

“मी ठरवलंच होतं; पहिल्या प्रयत्नात सिलेक्ट व्हायचं…” (UPSC Success Story of IAS Rushita Gupta)

IAS सारख्या अवघड परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणे सोपे नाही. पण ऋषिताने मात्र पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होण्याचा चंग मनाशी बांधला होता. एका मुलाखतीत ऋषिता म्हणाली की, “मी स्वत: ला कधीही सांगितले नाही की आणखी संधी येतील. मी ठरवलं होतं की, मला सिलेक्ट व्हायचं ते पहिल्या प्रयत्नातच.”

हे पण वाचा -
1 of 44

पहिल्याच प्रयत्नात ऋषिता कशी बनली IAS –

ऋषिताने अभ्यास केला, नोट्स बनवल्या, मॉक टेस्ट दिल्या, बर्‍याच वेळा रिव्हिजन केली आणि इंटरनेटसारख्या रिसोर्सेसचा पुरेपूर वापर केला. ऋषिताने प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन त्या दृष्टीने तयारी केली. मर्यादित पुस्तकांवर तिने अभ्यास केला. पण ती पुस्तकं वारंवार वाचली. संकल्पना नेहमीच स्पष्ट ठेवल्या आणि बेस मजबूत करण्यासाठी सगळ्यात आधी NCERT ची पुस्तके वाचली.

अधिकारी होणाऱ्यांसाठी ऋषिताचा कानमंत्र –

ऋषिताने सुरुवातीपासून लिखानावर खूप जोर दिला. (UPSC Success Story of IAS Rushita Gupta) तिने मुख्य परीक्षेच्या १५ दिवस आधी जवळजवळ दररोज सराव परीक्षा दिल्या. ज्यामुळे तिचा वेग खूपच सुधारला. यासोबतच मॉक टेस्टचा देखील बराच फायदा झाला. ऋषिताने असंही सांगितलं की, “निकाल काय लागेल? यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी केवळ तयारीवर लक्ष केंद्रीत करा. जर तयारी चांगली असेल तर निकाल देखील चांगला येणं स्वाभाविक आहे.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com