Success Story : कमी मार्क्स मिळालेत?? खचून जावू नका; या IAS ची मार्कशीट नक्की बघा

करिअरनामा ऑनलाईन। यशासाठी केवळ चांगले मार्क्स किंवा पैसा (Success Story) असणे आवश्यक नाही. असेच एक प्रेरणादायी उदाहरण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खरं तर, हे उदाहरण बिहारमध्ये राहणारे छत्तीसगड कॅडरचे IAS अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केले आहे. अवनीश शरण यांनी 10वीची मार्कशीट शेअर करून दाखवून दिले आहे की, नागरी सेवा किंवा इतर कोणत्याही मोठ्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी तुम्हाला वेगवान असण्याची गरज नाही, परंतु तुमच्याकडे समर्पण आणि कठोर परिश्रम असणे आवश्यक आहे.

Success Story IAS Avanish Sharan

ट्विट करण्यामागचा उद्देश

IAS अधिकारी अवनीश शरण यांनी 1996 मधील (Success Story) त्यांची दहावीची मार्कशीट ट्विटरवर ट्विट केली. त्यांना या ट्विटच्या माध्यमातून असं सांगायचं आहे, की तुमचे यश आकड्यांवर ठरत नाही. खरं तर, अवनीश यांनी शेअर केलेल्या मार्कशीटमध्ये त्याचे नंबरही दिसत आहेत. अवनीश शरण हे 10वी मध्ये तिसर्‍या विभागासह उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांना मार्कही खूप कमी मिळाले होते. त्यांना गणितात 100 पैकी 31 गुण मिळाले होते, तर उत्तीर्ण होण्यासाठी 30 गुण आवश्यक होते. सामाजिक शास्त्रातही त्यांचे गुण खूपच कमी होते. पास होण्याची कसोटी त्यांनी कशीतरी पार केली.

या ट्वीटने अनेकांना दिली प्रेरणा (Success Story)

अवनीश शरणचे यांनी केलेले ट्विट लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या ट्विटला आतापर्यंत 31 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर जवळपास 3 हजार लोकांनी रिट्विट केले आहे. यावर (Success Story) काही लोक प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका तरुणाने लिहिले आहे की, मलाही दहावीत कमी मार्क्स मिळाले होते. मला वाटायचे की मी कोणतीही मोठी परीक्षा पास करू शकणार नाही, पण हे ट्विट पाहून मला खूप प्रेरणा मिळाली आणि आता मी त्या दृष्टीने तयारीही करेन.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com