Study Tips : आता टेंशन घेवू नका; ‘या’ 5 टिप्स फॉलो करा आणि गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवा

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांचे आवडते आणि नावडते विषय (Study Tips) ठरलेले असतात. गणिताविषयी बोलायचे झाले तर अनेक विद्यार्थ्यांना हा विषय आवडतो, तर अनेकांना त्याची भीती वाटते आणि ते या विषयाचा अभ्यास करणं टाळतात. असे विद्यार्थी गणिताकडे जास्त लक्ष देत नाहीत आणि इतर विषयांवर लक्ष केंद्रित करतात. गणित विषयाची भीती बाळगण्याची आणि टाळण्याची अनेक कारणे आहेत. चला जाणून घेऊया अशा 5 टिप्स ज्या तुमच्यामध्ये गणिताविषयी गोडी निर्माण करतील.

1. बेसीक गोष्टीकडे लक्ष द्या

जर तुम्हाला गणित नीट समजून घ्यायचे असेल तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याच्याशी संबंधित सर्व मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे. ही बाब शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठीही महत्त्वाची आहे. शिक्षकांनी अगदी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना स्पष्ट करत राहायला हव्यात. विद्यार्थ्यांनीही (Study Tips) गणिताच्या मूलभूत गोष्टींकडे योग्य लक्ष दिल्यास त्यांना पुढील संकल्पना अधिक स्पष्टपणे समजू शकतील. यामुळे गणिताचा अभ्यास करणे खूप सोपे होईल.

2. प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं (Study Tips)

गणित हा एक असा विषय आहे ज्यामध्ये सर्व काही समजून घ्यावे लागते. नुसती रटाळ चालणार नाही. यामध्ये तुम्ही जितका चांगला सराव कराल तितके तुम्हाला सर्वकाही समजेल. गणितात चांगले गुण मिळवायचे असतील तर खूप सराव करावा लागेल. कोणतेही सूत्र लक्षात ठेवू नका, पेन आणि कागद घ्या आणि प्रश्नांसह त्याचा सराव करा. त्यामुळे गणिताचे प्रश्न सोडवण्याचा वेगही वाढेल.

3. चॅप्टरवर लक्ष केंद्रित करा

कोणताही चॅप्टर समजत नसेल तर तो सोडून पुढे जाण्याऐवजी त्यावर योग्य लक्ष केंद्रित करून सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही त्रिकोणमितीचा अभ्यास करत असाल आणि (Study Tips) त्याचे प्रश्न सोडवता येत नसाल, तर त्याला मध्येच सोडू नका. तो प्रश्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या मित्रांची, पालकांची आणि शिक्षकांची मदत घ्या.

4. फॉर्मुले पाठ करा

गणितात चांगले गुण मिळविण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याने त्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित सूत्रे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच त्यांना तक्तेही चांगले लक्षात ठेवावे लागतील. यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवणे सोपे जाईल.

5. डेली रुतीटीनमध्ये गणीतला वेळ द्या 

जर तुम्हाला गणितात चांगली कामगिरी करायची असेल तर तुम्हाला दररोज त्याचे प्रश्न सोडवावे लागतील. यामुळे सतत सरावही होईल आणि परीक्षा तोंडावर आल्यानंतर (Study Tips) दडपण घेण्याची गरज भासणार नाही.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com