दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालानंतर करावा लागेल ‘या’ २ वेबसाईटवर अर्ज 

करियरनामा ऑनलाईन। सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर आता दहावी १० वी आणि १२ वी परीक्षांचा निकाल लागला आहे. आता गुण पडताळणी, पुनर्मुल्यांकनसाठी राज्य महामंडळाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फेत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी फेब्रुवारी-मार्च २०२० परीक्षाचे निकाल जाहीर झाले आहेत. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकाची छायांकित प्रत देणे आणि पुनर्मुल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी मंडळामार्फत ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही. कोरोनाची परिस्थिती पाहता आणि राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना  गुण पडताळणी, पुनर्मुल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र लागणार आहे. त्यांच्यासाठी दोन संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी http://verification.mh-ssc.ac.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे.

या प्रक्रियेसाठी विहित शुल्क डेबिट, क्रेडिट आणि यूपीआय, नेट बँकिंगनेही भरता येणार आहे. mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. या वर्षी इयत्ता बारावीच्या १३ लाखहून अधिक तर दहावीच्या १७ लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com