आयटीआयला येणार अच्छे दिन , प्रवेशासाठी क्षमतेच्या दुप्पट अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI ) प्रवेशासाठी आतापर्यंत दुपटीहून अधिक अर्ज आले आहेत. दरवर्षीप्रमाणेच कोरोना काळातही आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कायम आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून आयटीआयसाठीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशासाठी १ लाख ४५ हजार ६३२ जागा आहेत. त्यासाठी आतापर्यंत ३ लाख ५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील २ लाख ७७ हजार ८२० विद्यार्थ्यांनी अर्ज भरून पूर्ण केले आहेत , तर २ लाख ६८ हजार २२६ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले असून २ लाख ५४ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम अर्ज भरल्याची माहिती संचालनालयाने दिली आहे.

आयटीआय प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळाली. प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत असल्याने प्रवेश अर्जाची संख्या आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.comwww.careernama.com