पुण्यात MPSC करणार्‍या विद्यार्थ्याची आत्महत्या; सदाशिव पेठेतील हाॅस्टेलवर केले विषप्राशन

पुणे : पुण्यात एमपीएससी परिक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमर रामचंद्र मोहिते (वय 33 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सदाशिव पेठेतील राहत्या हाॅस्टेलमध्ये विष घेऊन त्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे स्पर्धापरिक्षा करणार्‍या विद्यर्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, अमर मुळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तो मागील काही वर्षांपासून पुणे येथे स्पर्धापरिक्षेची तयारी करत होता. अमर यांचा भाऊ रामचंद्र दत्तात्रय मोहिते हे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील भोसरी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक पदावर कार्यरत आहे. परिक्षेच्या तणावातून अमर याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अमर मूळचा सांगलीचा रहिवाशी असून तो पाटील सदाशिव पेठ येथील हॉस्टेलमध्ये राहत होता. पीएसआय फिजिकलमधून बाहेर पडलेल्या अमर मोहीतेने सदाशिव पेठेतील राहत्या ठिकाणी आत्महत्या केल्याने स्पर्धापरिक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अमर याने कौंटुंबिक तणावातू असे टोकाचे पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे. मात्र अद्याप पोलिस तपासातून आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com