B.A. पास ते कोट्यावधी किंमतीच्या IT कंपनीचा मालक, मराठी मुलाची थक्क करणारी कहाणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

प्रेरणादायी |  गोष्ट आहे संकेत ओस्तवाल नावाच्या एका बी.ए. पास मुलाची आणि Benefito India Pvt Ltd कंपनीची स्थापना करणार्या एका एन्टरप्रिनरची. काॅलेजचं शिक्षण सुरु असताना कोण्या स्टाॅक मार्केट कंपनी मधे पार्ट टाईम जाॅब करणार्या एका धडपडणार्या तरुणाची आणि तिथं काम करत असताना “आपली पण एखादी कंपनी असायला पाहिजे जीचे शेयर याच स्टोक मार्केट मधे वर वर जाताना दिसायला पाहिजेत” असं स्वप्न पाहणार्या एका स्वप्नाळू युवकाची.

        पुण्याच्या स.प. महाविद्यालयात B.A. चं शिक्षण घेत असल्यापासूनच संकेतच्या डोक्यात बिझनेस करायचे वारे वाहायचे. पण घरची परिस्थिती बेताची. वडलांच्या नोकरीवर सार्या घराचा डोलारा अवलंबून होता. त्यावर घर कसतरि चालायचं. बी.ए. च्या पहिल्या वर्षात शिकणारा संकेत तेव्हा हे सगळं पहायचा. पण त्याला यात काहीच करता येण्यासारखं नव्हतं. सगळं त्याच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. पण तरीही तो धडपडत रहायचा. नविन नविन शक्कल लढवत रहायचा. परीक्षेचे फोर्म सुटले की संकेतचा बिझनेस सुरु व्हायचा. काॅलेजमधल्या बर्याच मुलांचे ओनलाइन फाॅर्म भरायचे काम संकेतकडे असायचे. त्यातुन तो जास्ती नाही पण हजार- दिड हजार सहज कमवायचा. यापैसातुन त्याची परिक्षा फी निघायची. संकेतला online कुठे काय फ्री मधे आहे याची सर्व बित्तबातमी असायची. कोणाला पिक्चरला जायचे असेल किंवा कोणाला रेल्वेचं, बसचं रिझर्वेशन करायचं असेल तर सर्वजन हमखास संकेतला फोन लावायचे. संकेतची ही सेवा २૪/७ सुरु असल्याने अन् पैसे नंतर भेटल्यावरती दिले तरी चालत असल्याने सगळ्यानाच ते सोइस्कर वाटायचं.

           २०१૪ च्या दरम्यान जेव्हा Paytm, Freecharge वगैरे बाजारात नवीन होते तेव्हा याने सर्वांसाठी मोबाइल रिचार्ज करण्याची सेवा सुद्धा सुरु केली. कधीपण मोबाइल मधला balance संपला की आता काॅलेजमधील प्रत्तेकजण संकेतलाच रिचार्ज मारायला सागू लागले. हळुहळु या पोरानं घराच्या आसपासच्या १५-२० रिचार्ज विक्रेत्याची डिलरशीपच घेतली. हा घरी बसुन सगळ्याचे Paytm वरुन रिचार्ज करायचा. तेव्हा अशा प्रकारची सेवा पुरवीणारे अॅप बाजारात नविन असल्याने अशा कंपन्यांकडुन बर्याचदा मोठ्या प्रमाणवर benefits उपलब्ध असायचे. त्याच benefits चा फायदा घेउन संकेतने अवघ्या ३ रु profit पासुन सुरवात करुन त्या काळात लाखभर रु ची कमाई केली. अन् वडीलांना लोन भेडण्यास हातभार लावला. अशाच एकदा ola की uber कॅब च्या पहील्या फ्री राईड चा फायदा घेउन cab चा प्रवास करताना त्याच्या डोक्यात फोर व्हीलर घेउन ती धंद्याला लावायचं खुळ घुसलं. जिथं बिझनेस आला तिथं रिस्क आलीच याची पुरेपुर जाणीव असलेल्या संकेतला एका कॅब ड्रायव्हरने ola/uber मधे गाडी लावायच्या बिझनेसचा फंडा समजावुन सांगीतला. मग काय पैसांची युद्दपातळीवर तजवीज करुन गड्याने लगेच एक गाडी घेउन कामावरपण लावली. आता त्याच्या पाच गाड्या ट्रव्हलींग एजन्सीजमधे भाडेतत्वावर कामाला आहेत. दरम्यान संकेतला त्याचा मोठा भाऊ संदेश दादा चा नेहमी पाठिंबा असायचा.

           एखाद्या बिझनेस मधून कधी बाहेर पडायचं हे जर समजलं तर माणुस कधीच तोट्यात जात नाही असं संकेतचं म्हणणं. कोणत्याच बिझनेसकडे लाइफ टाइम म्हणून नाही बघायला पाहिजे असं वाटणारा संकेत म्हणुनच योग्य वेळ साधुन ola/uber मधुन बाहेर पडला. या मधल्या कळात त्याला हे जाणवत होतं की आपल्यासरखे free मधील benefits शोधणारे खुप आहेत. परंतु पुरेसे शिक्षण झालेल्यांना सुद्धा ओनलाइन क्षेत्रातल्या बर्याच गोष्टींची माहिती नाहीये. benefits सर्वांना हवे आहेत पन ते कसे मिळवायचे हे मात्र कोणालाच ठिकसं माहिती नाहीय. आणि म्हणूनच संकेतने नुकतेच Benefito नावाचे एक अॅप स्थापन केले आहे. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अगोदर स्वप्न पहावी लागतात हे खरंच आहे. संकेतने त्याच्या स्वप्नांना कृतीची जोड दिली. कदाचीत त्यामुळेच बी.ए. अशी शेक्षणिक पात्रता असलेल्या संकेत कडे सध्या ८ इंजिनियर काम करतात. २ महिण्यांपूर्वी पैशांची कशीबशी तजवीज करुन त्याने हे app बनवले. आज या app चा बाजारभाव करोडो रुपये झाला आहे.“जर तुमच्याकडे मोबाईल असेल आणि जर तुमच्या मोबाईलला सिमकार्ड नंबर असेल तर तुम्हाला या जगात खुप काही मोफत मिळतं. परंतु लोकांना याबद्दल माहितीच नसते.” असं संकेत नेहमी म्हणत असतो. आपण बाजारात भाजीपाला आणायला गेल्यावर १-२ रु साठी कितीतरी वेळ वाद घालतो परंतु एखाद्या माॅल मधे वगैरे गेलो असेल तर मात्र जी कींमत वस्तुवर लिहीली असेल त्या किमतीला ती वस्तु खरेदी करतो. तिथे मात्र कोणीही कींमत पाडून मागण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. “आपण अशा ठिकानीसुद्धा उपलब्ध असलेल्या Benefits चा योग्य फायदा घ्यायला  पाहीजे” असं संकेतचं मत आहे. आपल्या भवताली उपलब्ध असलेल्या अशा सर्व Benefits विषयी संकेतचे हे Benefito App आपल्याला माहीती करुन देते.

हे पण वाचा -
1 of 12

Benefito चे आज सहा लाखांहून अधिक युजर्स झाले आहेत. या दोन वर्षांत बेनिफीटो कंपनीने चांगलीच प्रगती केली आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी गचागच भरलेल्या या देशात संकेत ओस्तवाल या एका २२वर्ष वयाच्या मुलाची गोष्ट बर्यापैकी शिक्षित असुनसद्धा हाताला काम नसलेल्या शेकडो तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. उच्च शिक्षणासोबतच आज कल्पनाशक्तीला वाव देण्याची गरज आहे हे नक्की.

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.

WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group

आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram

Get real time updates directly on you device, subscribe now.