Start Up Maharashtra : ‘चला उद्योजक होऊया’; उद्योजक होण्यासाठी मोफत प्रशिक्षण; असा घ्या लाभ

करिअरनामा ऑनलाईन। सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राईव्ह स्किल (Start Up Maharashtra) डेव्हलपमेंट सेंटर यांच्यातर्फे समुदाय उद्योजकता कार्यक्रम अंतर्गत ‘चला उद्योजक होऊया’ या उद्योजकता प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,नाशिक जिल्हा कौशल्य विकास केंद्र यांच्या सहकाऱ्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. व्यवसाय सुरु करु ईच्छिणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील युवक-युवतींनी या प्रशिक्षणासाठी संपर्क साधावा असे आवाहन ‘सह्याद्री फार्म्स’ यांच्याकडून करण्यात आले आहे.

सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी तरुणांसाठी मागील तीन वर्षात 700 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मागील वर्षांपासून पासून ‘समुदाय उद्योजकता कार्यक्रम’ प्रकल्प टाटा कॅपिटलच्या सहकार्याने राबविण्याचे निश्‍चित झाले आणि आज तो प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील एकूण 61 नवद्योजकांना मोफत प्रशिक्षण आणि भांडवल उपलब्ध करून दिले आहे. 61 होतकरू उद्योजकांना टाटा कॅपिटल यांचेकडून 23.5 लक्ष भांडवल उपलब्ध करून दिले आहे.

समुदाय उद्योजकता कार्यक्रमाच्या’ माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊन आपला व्यवसाय आराखडा सादर (Start Up Maharashtra) करणे गरजेचे असते. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे त्यांची निवड करून मग 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. त्या प्रशिक्षणानंतर परत त्यांचे सादरीकरण पाहून त्यांना भांडवल उपलब्ध केले जाते.

जानेवारी 2021 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान प्रशिक्षण घेतलेल्या 3 बॅचमधील एकूण 61 नवउद्योजक प्रशिक्षण घेऊन स्वतःच व्यवसाय सुरू केला आहे. कोरोनामुळे बऱ्याच तरुणांना आपली नोकरी गेल्यामुळे गावी परतावे लागले. अशा तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी कुक्कुटपालन, शेळीपान, किराणा दुकान, गॅरेज, मत्स्यपालन, ब्युटीपार्लर अशा क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, अशी माहिती सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – (Start Up Maharashtra)

8698411288 / 92846 51041

या लिंक वर अर्ज करा –

https://forms.gle/1qxq8bu5fPvFMwkT9

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये –

1) स्थानिक व्यावसायिक संधी नुसार प्रशिक्षण

2) व्यवसायाला अनुरूप मार्गदर्शन

3) पात्र प्रशिक्षणार्थिना आर्थिक सहाय्य

4) व्यवसायातील तज्ञांकडून मार्गदर्शन

5) 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण

6) तंत्रज्ञान मार्गदर्शन

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये उद्योजकता वाढावी या हेतूने या उपक्रमाची सुरुवात केली आहे. तरुणांमधील उद्योजकीय कौशल्यांना वाव मिळावा यासाठी हे प्रशिक्षण (Start Up Maharashtra) उपयुक्त ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहनही सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांनी केले आहे.

संपर्क पत्ता –

मोहाडी,तालुका – दिंडोरी,जिल्हा – नाशिक

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com