आरटीईच्या २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

करिअरनामा । अनुसूचित जाती,जमाती,आणि दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खाजगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत शिक्षण मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी ६ फेब्रुवारी पर्यंत सर्व शाळेची नोदंणी होणार आहे. तरी ११ ते १९ फेब्रुवारी पर्यंत पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत .

शिक्षण हक्क कायदा नुसार मागासवर्गीय,आर्थिक दुर्बल घटकातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना आहे . समाजातील काही घटक शिक्षणापासून वंचित आहे त्या घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे . प्राथमिक तसेच खासगी शाळेत २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात . या वर्षी या राखीव जागेसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे.

सन २०१९-२० या वर्षी नोंदणी झालेल्या आरटीई २५ टक्के पात्र शाळांचे अटोमेटीक रजिस्टेशन करण्यात येणार आहे तसेच खाजगी शाळांना २१ जानेवारी पासून ते ६ फेब्रुवारी या दरम्यान नोंदणी करावी लागणार आहे . त्यानंतर ११ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी पर्यंत पालकांना पाल्याचे मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत .

नोकरी विषयक माहिती थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7821800959  या नंबरवर WhatsApp  करा आणि लिहा “HelloJob “