Staff Reduction : नव्या वर्षातील सर्वात मोठी नोकर कपात, ‘या’ कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट

करिअरनामा ऑनलाईन । सध्या जागतिक बाजारपेठेत नोकरीची (Staff Reduction) अत्यंत वाईट स्थिती सुरू आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. मेटा, ट्विटरपाठोपाठ आता आणखी काही कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेझॉन ई-कॉमर्स कंपनीही मोठ्या प्रमाणावर ऑफिस बंद करण्याच्या तयारीत आहे. अमेझॉन असं का करत आहे  असा प्रश्न पडला आहे. ही कंपनी 18 हजारहून अधिक (Staff Reduction) कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. अमेझॉनने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे’ कर्मचारी कपात करणार असल्याचं अमेझॉनच्या व्यवस्थापनाने सांगितलं आहे.

सीईओ अँडी जेसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नोव्हेंबरमध्ये आम्ही जे जाहीर केलं त्यानुसार आमची भूमिका स्पष्ट आहे. जवळपास 18 हजारहून अधिक (Staff Reduction) कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.” 2022 नोव्हेंबरमध्ये अमेझॉनने जवळपास 10 हजार कर्मचारी कामावरून काढले होते.

अमेझॉनकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कर्मचारी कपात असल्याचं सांगितलं जात आहे. आतार्यंत 15 लाख कर्मचारी अमेझॉनसोबत काम करत होते. त्यापैकी 10 हजार कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरमध्ये काढण्यात आलं. आता पुन्हा 18 हजार कर्मचाऱ्यांना काढलं जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मंदीचं सावट आहे. त्यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करत आहेत. कंपन्यांना इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिथलं भाडं कमी करायचं (Staff Reduction) असल्याने कर्मचाऱ्यांची कपात सुरू झाली आहे.

IT सेक्टरमध्ये देखील यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. भारतातील कंपन्यांची सध्या स्थिती ठिक असली तरी याचा परिणाम भारतावर आणि शेअर मार्केटवर कसा होतो ते देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com