SSC Result 2022 : हुर्रे !!! राज्याचा दहावीचा निकाल 96.94%, यंदाही मुलींनीच मारली बाजी!! कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27%

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Result 2022) फेब्रुवारी – मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वात जास्त निकाल लागला आहे तर सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे.

यंदाही मुलींनी मारली बाजी

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या (SSC Result 2022)

राज्यात 8 माध्यमांसाठी परिक्षा झाली. राज्यातील पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, आैरंगाबाद, लातूर, नाशिक व कोकण या  9 विभागातून 15 लाख 84 हजार 790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 68 हजार 977 परिक्षेला बसले होते. तर 15 लाख 21 हजार 003 उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णची टक्केवारी 96.94 टक्के अशी आहे.

कोकण विभाग आघाडीवर

राज्यात कोकण विभागाचा निकाल 99. 27 टक्के लागला आहे. राज्यात मुलीचे उत्तीर्णची टक्केवारी 97. 96 तर मुलाची टक्केवारी 96. 06 आहे. त्यामुळे मुलींनी बाजी मारली आहे. राज्यातील (SSC Result 2022) 66 पैकी 24 विषयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. निकालात 6 लाख 50 हजार 779 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 5 लाख 70 हजार 027 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 2 लाख 58 हजार 027 विद्यार्थी तृतीय श्रेणीत तर 42 हजार 70 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. राज्यात 22 हजार 921 माध्यमिक शाळांतून 16 लाख 38 हजार 964 विद्यार्थी परिक्षेस होते. त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

येथे पहा निकाल –

http://mahresult.nic.in/

http://sscresult.mkcl.org/

https://ssc.mahresults.org.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com