SSC Result 2022 : मोठी बातमी!! 15 जूनला जाहीर होणार 10 वी चा निकाल; ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी ‘हे’ करा

करिअरनामा ऑनलाईन । 12 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आता प्रतीक्षा (SSC Result 2022) आहे ती 10 वी च्या निकालाची. निकालाबाबत 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे. शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आणि निकालाविषयी कुतूहलही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल येत्या 15 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

12 वी परीक्षेचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही 90 टक्क्यांच्या वर लागला. निकालात मुलींनी बाजी मारली तर सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला. हजारो विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांच्यावर गुण मिळाले.

दरवर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी (SSC Result 2022) आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. बारावीचा निकाल याआधीच जाहीर करण्यात आला आहे. मात्र आता प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल हा येत्या 15 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निकाल कसा पहाल – (SSC Result 2022)

  1. इयत्ता 10वीचा निकाल पाहण्यासाठी www.mahresult.nic.in या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
  2. Website उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा.
  3. यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका.
  4. विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील.
  5. नंतर View Result पर्यायावर क्लिक करा.
  6. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल.
  7. पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड करा
  8. निकाल सेव्ह करायला विसरू नका

येथे पाहू शकता निकाल –

  1. mahahsscboard.in
  2. msbshse.co.in
  3. mahresult.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com