साऊथ इंडियन बँकेत होणार भरती

करिअरनामा । साऊथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी मॅनेजर, मुख्य सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज www.southindianbank.com या अधिकृत वेबसाईटवर आपले अर्ज करावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – प्रोबेशनरी मॅनेजर, मुख्य सुरक्षा अधिकारी

पद संख्या – १६ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

फी – सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २००/- रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ फेब्रुवारी २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.