Soil Testing Lab : नोकरी शोधून सापडत नाही? गावात राहूनच करा ‘हा’ व्यवसाय; सरकार करणार मदत

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना संक्रमणानंतर शहरांमधील रोजगाराच्या संधीही कमी झाल्या आहेत. अनेकजण (Soil Testing Lab) मोठ्या शहरातून गावाकडे स्थलांतरीत झाले आहेत. तसेच कोरोना महामारीच्या काळात आपापल्या गावी परतलेले लोक तिथे स्वतःसाठी काम शोधत आहेत. तुम्हाला शेती न करता गावात राहून पैसे कमवायचे असतील तर केंद्र सरकार तुमच्यासाठी योजना राबवत आहे. सरकार या योजनेंतर्गत आर्थिक मदत करेल, आणि थोडी रक्कम तुम्हाला गुंतवावी लागेल. जर तुम्हाला गावात शेतीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ‘सॉईल हेल्थ कार्ड’ योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

माती परीक्षण प्रयोगशाळा चालवण्याची संधी –

सॉईल हेल्थ कार्ड योजनेंतर्गत, पंचायत स्तरावर लहान माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी सरकार मदत करते. या प्रयोगशाळेत जवळपासच्या शेतातील मातीची चाचणी केली जाते. सध्या (Soil Testing Lab) देशाच्या ग्रामीण भागात अशा प्रयोगशाळा फार कमी आहेत. जर तुम्हाला या व्यवसायात रस असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करून तुमच्या गावातच चांगली कमाई करू शकता. या क्षेत्रातही रोजगाराच्या अनेक संधी आहेत.

कोणाला होणार फायदा – (Soil Testing Lab)

मृदा आरोग्य कार्ड योजनेअंतर्गत, 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती त्यांच्या पंचायतीमध्ये एक लहान माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करू शकतात. परंतु केवळ तेच लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतील, ज्यांनी कृषी क्लिनिक, कृषी उद्योजक प्रशिक्षण घेऊन 10वी उत्तीर्ण केली आहे. शेतकरी कुटुंबाशी संबंधित असलेले लोकच या योजनेसाठी अर्ज करू शकतील.

असा करा अर्ज

मिनी माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी, तुम्हाला (Soil Testing Lab) तुमच्या जिल्ह्यातील उपसंचालक (कृषी) किंवा सहसंचालक कृषी यांच्याशी त्यांच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधावा लागेल. याशिवाय चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी agricoop.nic.in वेबसाइट आणि soilhealth.dac.gov.in वरही संपर्क साधता येईल.

कुठे जमा कराल फॉर्म

अधिक माहिती हवी असल्यास शेतकरी कॉल सेंटर (1800-180-1551) वर संपर्क साधू शकतात. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यास, तुम्हाला मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत एक लघु चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी एक फॉर्म प्रदान केला जाईल. फॉर्म भरून आणि आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून तुम्हाला तो कृषी विभागाकडे जमा करावा लागेल.

इतकी आहे गुंतवणूक

पंचायतीमध्ये कोणतीही लहान माती परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च येतो. परंतु सॉईल हेल्थ कार्ड योजनेंतर्गत सरकार लॅब इन्स्टॉलरला 75 टक्के रक्कम देते. तुम्हाला तुमच्या पंचायतीमध्ये लॅबची स्थापना करायची असेल तर सरकारकडून तुम्हाला 3.75 लाख रुपये दिले जातील.
त्यासाठी तुम्हाला 1.25 लाख रुपये खर्च करावे लागतील. गावपातळीवर माती परीक्षण प्रयोगशाळा उघडण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची किंवा भाड्याने घेतलेली काँक्रीटची जागा असणे आवश्यक आहे. ग्रामीण तरुणांना शक्य असेल तर मोबाईल सॉईल टेस्टिंग व्हॅनच्या स्वरूपात प्रयोगशाळाही उभारता येईल.

अशी होते कमाई –

या प्रयोगशाळेत तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने घेऊन त्याची चाचणी करावी लागणार आहे. या आधारे, तुम्हाला मृदा आरोग्य पत्रिका छापण्यासाठी आणि वितरणासाठी प्रत्येक (Soil Testing Lab) नमुन्यासाठी 300 रुपये मिळतात. अशा प्रकारे तुम्ही एका महिन्यात 15-25 हजार रुपये सहज कमवू शकता.

असा होणार माती परीक्षणाचा फायदा

मृदा चाचणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीत कोणते पोषक घटक आहेत याची माहिती मिळते. यासोबतच खतांचा तुटवडा आणि युरियाचा वापर त्यांच्या शेतात किती प्रमाणात करावा हेही कळते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com