धक्कादायक! बोर्डाची परीक्षा द्यायला गेलेल्या ३२ विदयार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण 

करिअरनामा ऑनलाईन । सध्या कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी सर्वठिकाणी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहे. अनेक ठिकाणी विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द कऱण्यात आल्या आहेत. मात्र कर्नाटक राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आली आहे. २५ जून ते ३ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेला उपस्थित राहिलेल्या ३२ मुलांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. सर्व काळजी घेऊनही विद्यार्थ्यांना संक्रमण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या ३२ मुलांना संक्रमण झाल्याचे उघड झाल्यावर इतर ८० विद्यार्थ्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षा हॉलमध्ये जाताना विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले होते. शिवाय वर्गात सगळीकडे सॅनिटायझेशन करत फवारणी करण्यात आली होती. तसेच कन्टेंन्मेंट झोनमधून आलेल्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वेगळी करण्यात आली होती. तरीही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यात दहावीच्या परीक्षेबद्दल बरीच साशंकता होती. अखेर शिक्षणखात्याने परीक्षेला मान्यता दिली होती. सर्व खबरदारी घेऊनही संसर्ग झाल्याने कर्नाटकातील वातावरण चिंतादायक झाले आहे. महाराष्ट्रातही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी याला विरोध केला आहे.

नोकरी आणि करिअर विषयक माहिती थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)