सेट परीक्षेची तारीख जाहीर; पहा कधी होणार आहे सेट परीक्षा…
करिअरनामा । राज्यात सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी ‘सेट’ परीक्षा येत्या २१ जून रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी १ ते २१ जानेवारी दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. गतवर्षी प्रमाणेच ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार
आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगा (यूजीसी) ने महाराष्ट्र व गोव्यासाठी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर सोपवली आहे. त्यानुसार विद्यापीठातर्फे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ‘ही परीक्षा २१ जून रोजी होईल. पहिला पेपर सर्वांसाठी समान असेल, तर दुसरा पेपर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयानुसार असेल. एकूण ३२ विषयांसाठी ही परीक्षा होईल,‘ अशी माहिती सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस
यांनी दिली.
‘नॉन क्रिमिलिएर गटातील विद्यार्थ्यांकडे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आर्थिक वर्षातील वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या मागास गटाचे आरक्षणही या परीक्षेला लागू असेल असे डॉ. कापडणीस यांनी
स्पष्ट केले आहे.
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.