लीला पुनावाला फाऊंडेशनच्यावतीने मुलींसाठी शिष्यवृत्तीची संधी; असा अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । लीला पुनावाला फाऊंडेशनच्यावतीने (एलपीएफ )आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींच्या निःशुल्क शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यतील कोणत्याही महाविद्यालयात २०२०- २०२१ मध्ये शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या मुली यासाठी अर्ज करू शकतात. गेल्या २५ वर्षांपासून फाऊंडेशने पुणे ,वर्धा ,अमरावती जिल्हा आणि नागपूर शहरातील ९३०० पेक्षा जास्त मुलींना शिष्यवृत्ती दिली आहे.

शिष्यवृत्तीचा तपशील –

बी.ई. किंवा बी.टेक. , बारावी ,डिप्लोमा बीएस्सीमध्ये नर्सिंग आणि बी.फार्मसी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

अभियांत्रिकी (बी.ई.) / बी.टेक. – २ फेब्रुवारी २०२१

इंजिनीरिंग डिप्लोमानंतर – ७ फेब्रुवारी २०२१

बीएस्सी नर्सिंग आणि बी.फार्मसी – १४ फेब्रुवारी २०२१

अर्ज प्रक्रिया – अर्जासाठी www.lpfscholarship.com /www.lilapoonawallafoundation.com या वेबसाईटला क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट – www.lpfscholarship.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com