Scholarship : खुशखबर!! 10 वीच्या विद्यार्थ्यांना 15,000 तर 12 वीच्या विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना (Scholarship) अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे . या योजनेअंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे.

एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम किंवा दहावी करिता रक्कम 15 हजार व बारावी करिता रक्कम 25 हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे.

अर्थसहाय्य उपलब्ध रक्कम व प्राप्त अर्ज यांचा विचार करून देण्यात येणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुधारित शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत खालील नियम व अटींत बसणाऱ्या मुलांच्या पालकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर अर्ज ऑनलाइन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भरायचे आहेत. उपरोक्त योजनेचे अर्ज दि. 22 ऑगस्ट 2022 ते दि. 30 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आहेत लिंक्स – (Scholarship)

जाहिरात पाहण्यासाठी येथे CLICK करा – जाहिरात

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – अर्ज

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com