पूर्व प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीऐवजी एप्रिलमध्ये होणार

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा करोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास देखील विलंब झाला होता. नाशिक जिल्ह्यातील ५७ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com