SBI Recruitment 2022 : परीक्षा न देता मिळवा SBI मध्ये नोकरी, जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन | स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India, SBI) मध्ये विविध (SBI Recruitment 2022) पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, प्रोजेक्ट-डिजिटल पेमेंट, उत्पादन-डिजिटल पेमेंट/कार्ड, उत्पादन-डिजिटल प्लॅटफॉर्म यासह अनेक पदे भरली जाणार आहेत. एकूण 55 जागांवर ही भरती होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया

भरली जाणारी पदे – व्यवस्थापक, प्रोजेक्ट-डिजिटल पेमेंट, उत्पादन-डिजिटल पेमेंट/कार्ड, उत्पादन-डिजिटल प्लॅटफॉर्म

पद संख्या – 55 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022

आवश्यक पात्रता – (SBI Recruitment 2022)

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात बीकॉम/बीटेक असणे आवश्यक आहे. किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह एमसीए किंवा एमबीए / पीजीडीएम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

मिळणारे वेतन –

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना MMGS-III रु. अंतर्गत वेतनश्रेणी मिळेल.

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 78,230 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया –

या पदांसाठी निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल. बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

आवश्यक कागदपत्रे –

  1. रेझ्युमे
  2. दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (MBA )
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो
  7. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा अर्ज दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

आरक्षण –

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. (SBI Recruitment 2022)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – sbi.co.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK  करा – https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2022-23-25/apply 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com