SBI PO Prelims Result 2020 । असा पहा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । SBI PO Prelims परीक्षेचा निकाल (SBI PO prelims result 2020) जाहीर झाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. अधिकृत वेबसाईट bank.sbi  आहे. त्यात करिअर सेक्शनमध्ये निकाल पाहता येईल.

उमेदवारांनी ही प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी घेतलेली परीक्षा दिली आहे, ते आपल्या रोल नंबर आणि जन्मतारीख आदि माहितीच्या सहाय्याने लॉग इन करून निकाल पाहू शकतील. निकालाची थेट लिंक या वृत्तातही पुढे देण्यात येत आहे. भविष्यातील संदर्भासाठी उमेदवारांनी निकालाची एक प्रत काढून ठेवावी.स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ४,५ आणि ६ जानेवारी रोजी देशभरात विविध केंद्रांवर परीक्षा घेतली होती. जे उमेदवार या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. SBI PO मुख्य परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरच अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात येणार आहे.

एसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करताना स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. एकूण रिक्त पदांच्या सुमारे दहा पट उमेदवारांची ही यादी आहे. या यादीतले उमेदवार मुख्य परीक्षा देऊ शकणार आहेत. मुख्य परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०२१ च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. त्यानंतर मार्च महिन्यात मुलाखती होतील. अंतिम निकाल मार्च २०२१ च्या अखेरच्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

मुख्य परीक्षेचा पॅटर्न – 

SBI PO Main Exam एकूण २५० गुणांची असेल. यापैकी वस्तुनिष्ठ प्रश्न २०० गुणांचे तर वर्णनात्मक प्रश्नांना ५० गुण असणार आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com