SBI Clerk मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा करा ‘चेक’ निकाल

मुंबई । भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर SBI Clerk मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही ज्युनिअर असोसिएट्स भरतीसाठी झालेली मुख्य परीक्षा (SBI Clerk Mains examination 2020) दिली होती त्यांनी आपला निकाल sbi.co.in या संकेतस्थळावर पाहावा.

या भरती प्रक्रियेद्वारे तब्बल ८ हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यापैती ७,८७० पदे नियमित आहेत तर १३० पदे विशेष भरती प्रक्रियेतील आहेत. एसबीआय क्लर्क मुख्य परीक्षा २०२० ही ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती.

SBI Clerk Mains Results 2020: असा पाहा निकाल –

१ ) सर्वात आधी स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in/career येथे जा.

२) त्यानंतर ‘RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) (Advertisement No. CRPD/CR/2019-20/20)’ या लिंकवर क्लिक करा.

३) एसबीआय क्लर्क मुख्य परीक्षा २०२० चा निकाल पीडीएफ फाइल स्वरुपात तुमच्या स्क्रीनवर उघडेल.

४) निकाल डाऊनलोडही करता येईल आणि त्याचे प्रिंटआऊटही घेता येईल.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com