सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ‘लिडर्स’चा दर्जा

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण क्षेत्रातील एक आघाडीचे विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे बघितले जाते. ह्या विद्यापीठाने आजवर अनेक व्यक्तींना घडवले आहे. आणि आता पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिरात एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाला महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून ‘लिडर्स’चा दर्जा प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून नेहमी विद्यापीठे, कंपन्या आणि नवोपक्रम यांना चांगल काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जात. त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नवोपक्रमांची 3 विभागात विभागणी करण्यात आली. एखाद्या संस्थेच्या कामानुसार ‘बिगीनर्स’, ‘एमेर्जिंग’ आणि ‘लिडर्स’ असा दर्जा देण्यात आला. आणि ह्या मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लिडर्स चा दर्जा देण्यात आला.

नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाच्या प्रमुख अपूर्वा पालकर म्हणाल्या की, ” आम्ही विद्यापीठाबाहेरील अनेक नवउद्यामींसह काम करत आहोत. विद्यापीठ ह्या विषयासंबंधी राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठांशी संलग्न आहे. विद्यापीठाने बाहेर पण अनेक नवोपक्रम केंद्रांची स्थापना केली आहे,” तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर म्हणाले की, “विद्यापीठाने नवउद्योमींवर लक्ष केंद्रित केले आहे. आणि भविष्यात नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांच्या दिशेने प्रगती होईल”.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group: https://chat.whatsapp.com/CCWOk9AmW9P4O7UpdSpIoe

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com/