Sanju Samson : मनात होती IPS ची क्रेझ … पण बनला क्रिकेटर; जाणून घ्या संजू सॅमसनच्या करिअरविषयी

करिअरनामा ऑनलाईन। टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज संजू सॅमसनच्या (Sanju Samson) फंलदाजीची चर्चा नेहमीच होत असते. त्याच्या खेळाला चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळत असते. त्याला टिम इंडियामध्ये स्थान मिळावे यासाठी चाहते बीसीसीआयवर दबाव टाकताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडियातही संजू सॅमसनची क्रेझ पाहायला मिळते. आज आपण त्याच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया.

Sanju Samson

केरळचा सुपुत्र

केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पुलुविल गावात जन्मलेल्या संजूने आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. देशांतर्गत हंगाम आणि आयपीएलमधील धमाकेदार (Sanju Samson) कामगिरीच्या जोरावर संजूने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आणि खूप नाव कमावले. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे.

IPL मध्ये आपल्या कामगिरीने प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी संजू एक आहे. संजू सॅमसनचा जन्म ११ नोव्हेंबर १९९४ रोजी केरळमध्ये झाला. त्याचे वडीलही फुटबॉलपटू होते. संजू सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ संतोष ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळले होते.

Sanju Samson

संजूला व्हायचं होतं IPS (Sanju Samson)

स्फोटक फलंदाज संजू सॅमसनचे वडील दिल्ली पोलिसात होते. संजूचे बालपणही दिल्लीत गेले. तो पोलीस निवासी कॉलनीत राहत होता. संजूनेही आपले शिक्षण दिल्लीतूनच केले. संजूला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी वडिलांनी नोकरीचा त्याग केला. संजू सॅमसनचे करिअर घडवण्यामागे (Sanju Samson) त्याचे वडील विश्वनाथ यांचा मोठा हात आहे. खरंतर संजूला IPS व्हायचं होतं. पण वडिलांनी संजूला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. संजू दिल्लीत 13 वर्षांखालील संघात स्थान मिळवू शकला नाही. तेव्हा वडिलांना वाटले की, मुलगा दिल्लीत क्रिकेटमध्ये प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे ते दिल्लीतील पोलीस हवालदाराची नोकरी सोडून केरळला परतले. तेथे संजू शाळा-कॉलेज स्तरावर खेळला आणि त्याने टीम इंडियापर्यंतचा प्रवास केला.

Sanju Samson

असं आहे संजू सॅमसनचं क्रिकेट करिअर

28 वर्षीय संजू सॅमसनने 2015 मध्ये भारताकडून टी- 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणानंतर 6 वर्षांनी 2021 मध्ये पहिला वन डे खेळला. संजू सॅमसनने 7 वर्षात (Sanju Samson) केवळ 26 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तर 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 294 धावा केल्या आहेत. टी 20 फॉरमॅटमध्ये 16 सामन्यांच्या 15 डावांमध्ये त्याने 296 धावा केल्या आहेत.

संजू सॅमसन 2013 पासून सतत आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने 138 आयपीएल सामन्यांमध्ये 3526 धावा केल्या आहेत. संजूच्या नावावर आयपीएलमध्ये 3 शतके आणि 17 अर्धशतके आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com