MPSC परिक्षा स्थगित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल; ठाकरेंसोबतच्या बैठकिनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत एमपीएससी परिक्षा स्थगित करावी अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. आज यासंदर्भात भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. MPSC परिक्षा स्थगित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे यावेळी खासदार भोसले यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू शांतपणे ऐकलेली आहे. आम्ही पोझिटिव्हली मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहतोय. आम्ही आमचे आंदोलन सुरु ठेवणार आहोत. MPSC बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. असे भोसले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आम्ही सध्या वॅट अॅन्ड वाॅच च्या भुमिकेत. नियुक्ती न झालेल्यांची आधी सरकारने नियुक्ती करावी. ४२० उमेदवार नियुक्तीची वाट पाहत आहेत असाही भोसले यांनी म्हटले आहे.