सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नोकरीची संधी!! मुलाखतीव्दारे होणार निवड; जाणून घ्या…

करिअरनामा ऑनलाईन । सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर येथे (Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2022) इकोलॉजिस्ट, पशुवैद्यकीय अधिकारी, उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ, GIS तज्ञ, निसर्ग विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर, प्रशासकीय अधिकारी या रिक्त पदांवर कंत्राटी तत्वावर पद भरती होणार आहे. या भरतीव्दारे एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 आहे.

पदाचे नाव – इकोलॉजिस्ट, पशुवैद्यकीय अधिकारी, उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ, GIS तज्ञ, निसर्ग विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, कार्यालय सहाय्यक, सह ग्राफिक डिझायनर, सह संगणक ऑपरेटर, प्रशासकीय अधिकारी

पद संख्या – 14

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा – 415539

ई-मेल – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2022 आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

सूचना – (Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2022)

  1. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. अर्जाची छाननी करून दिनांक 23.5.2022 रोजी (शक्य झाल्यास) मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित, कराड या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येतील.
  4. 24 मे पासून (शक्य झाल्यास) मुलाखती प्रारंभ होतील.
  5. यादीत नमूद दिनांक व वेळेस मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

 

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com