पुण्यातील ‘साधू वासवानी’ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

करिअरनामा आनलाईन : साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे (Sadhu Vaswani Institute of Management Studies For Girls) इथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, नेटवर्क प्रशासक, शिपाई, रिसेप्शनिस्ट, प्रशासन या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे. यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे.

पदाचे नाव-

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

ग्रंथपाल (Librarian)

नेटवर्क प्रशासक (Network Administrator)

रिसेप्शनिस्ट सह प्रशासन (Receptionist cum Administration)

शिपाई (Peon)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

१. कोणत्याही शाखेतील पदवी
२. उमेदवाराचं शिक्षण AICTE च्या नियमांनुसार पूर्ण असणं आवश्यक
३. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक

ग्रंथपाल (Librarian) पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

१. M.Lib. ची पदवी आवश्यक

२. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक

नेटवर्क प्रशासक (Network Administrator) पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

१. कोणत्याही शाखेतील पदवी

२. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

शिपाई (Peon) पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

१. दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक

२. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

रिसेप्शनिस्ट सह प्रशासन (Receptionist cum Administration) पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

१. दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक

२. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे-

१. Resume (बायोडेटा)

२. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे

३. शाळा सोडल्याचा दाखला

४. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

५. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

६.फोटो (पासपोर्ट साईझ)

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचा पत्ता-
साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, 6, सातारा – कोरेगाव रोड, सेंट मिराज कॉलेज फॉर गर्ल्सच्या पुढे, संगमवाडी, पुणे, महाराष्ट्र 411001

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी –click here या लिंकवर क्लिक करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com