Reliance Foundation : नवीन वर्षात रिलायन्स फाउंडेशन देणार 5100 स्कॉलरशिप!! कोणाला होणार फायदा?

करिअरनामा ऑनलाईन । स्व. धीरूभाई अंबानी यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त (Reliance Foundation) रिलायंस फाउंडेशनकडून एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन तर्फे 2022-23 या वर्षात तब्बल 5000 UG आणि 100 PG विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स देण्यात येणार आहे. तसंच पुढील दहा वर्षांमध्ये तब्बल 50,000 स्कॉलरशिप्स देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

‘या’ विद्यार्थ्यांना होणार फायदा (Reliance Foundation)

या स्कॉलरशिप अंतर्गत अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. तर या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरिट बेसिसवर ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

तसंच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना तब्बल सहा लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरिट बेसिसवर ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, लाईफ सायन्स या क्षेत्रातील PG विद्यार्थ्यांना हि स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

असा करा अर्ज –

या स्कॉलरशिपसाठी संपूर्ण भारतातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे. शिष्यवृत्तीची बांधिलकी भारतातील (Reliance Foundation) तरुणांच्या क्षमतेवरील विश्वास दर्शवते असं रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी यांनी म्हटलं आहे. रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती आता भारतातील सर्वात मोठ्या परोपकारी संस्थांपैकी एक आहे असं ही त्यांनी म्हंटल आहे.

भारताची अर्धी लोकसंख्या, किंवा 600 दशलक्षाहून अधिक भारतीय, 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. रिलायन्स फाऊंडेशन तरुणांचा उच्च शिक्षणाचा प्रवेश मजबूत करण्यासाठी (Reliance Foundation) वचनबद्ध आहे. यावर्षी रिलायन्स फाऊंडेशनचे  अंडरग्रेजुएट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे उद्दिष्ट आहे. मेरिट-कम-मीन्स निकषांवर आधारित 5,000 गुणवंत विद्यार्थ्यांना समर्थन मिळावं म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे असं नीता अंबानी यांनी सांगितलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com