ठाणे महापालिकेत नर्स पदासाठी मोठी भरती; पगार ४० हजारांपर्यंत

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । ठाणे महानगरपालिकेत सरकारी नोकरीसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. (Thane Municipal Corporation Recruitment 2020) ठाणे महापालिकेत नर्स पदासाठी मोठ्या संख्येने भरती सुरु झाली आहे. नर्सिंगचं शिक्षण घेतलं असल्यास आणि या पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण केल्यास नर्स पदासाठी, (GNM and ANM) सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येऊ शकतो. या रिक्त पदांसाठी उमेदवाराची थेट निवड केली जाणार आहे.

पद – नर्स (GNM and ANM)
रिक्त जागा – 1830
पात्रता – GNM/B.Sc नर्सिंग डिग्री, ANMमध्ये डिग्री (2 ते 3 वर्षांचा अनुभव)
वयोमर्यादा – नियमानुसार
वेतन – 35 ते 40 हजार रुपये प्रति महिना

ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारिख 28 जुलै 2020 आहे.

हे पण वाचा -
1 of 4

या पदासाठी उमेदवाराला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल. https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या किंवा https://est.tmconline.in/ या लिंकवर रजिस्ट्रेशन करता येईल. या लिंकवर ऍप्लिकेशन फॉर्म भरुन 28 जुलैपूर्वी सबमिट करावा लागेल.

या भरतीबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार टीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात. यात उमेदवाराची निवड शॉर्ट लिस्टिंग लिखित परीक्षा / कौशल्य चाचणी अर्थात स्किल टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

त्याशिवाय, उमेदवाराला शारीरिक तंदुरुस्ती-फिजिकल फिटनेस आणि वैद्यकीय-मेडिकल फिटनेस असणं देखील महत्त्वाचं आहे. फ्रेशर्स देखील या पदासाठी अर्ज करु शकतात. या रिक्त जागांसाठी काम करण्याचं ठिकाण ठाणे असणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: