नव्या वर्षात 32,000 नव्या नोकऱ्यांच्या संधी ; 10 वी पासून PG पर्यंत शिकलेल्याना सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकार आणि विविध राज्यांत जाहीर झालेल्या भरती जाहिरातींनुसार जानेवारी 2021 मध्ये 32000 हून अधिक सरकारी नोकरीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर जानेवारी 2021च्या या 32000 सरकारी नोकरी भरती अधिसूचना तसेच अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. Recruitment 2021 Notification

SSC CGL 2020: केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये 6506 सरकारी नोकऱ्या, अर्ज कसा करावा – 

केंद्र सरकारच्या मंत्रालये, विभाग आणि इतर संस्थांमधील गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या एकूण 6506 पदांवर भरतीसाठी कर्मचारी निवड आयोग (SSC) कडून सीजीएल 2020 च्या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. एसएससी सीजीएल 2020 परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ssc.nic.in वर 31 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.

MHA IB ACIO Recruitment 2020: : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 2000 पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा-

केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सहाय्यक केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी ग्रेड 2 च्या 2000 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर सुरू आहे. mha.gov.in. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2021 निश्चित करण्यात आलीय. Recruitment 2021 Notification

Post Office Recruitment 2021: टपाल विभागात 4269 ग्रामीण डाक सेवकांची भरती-

कर्नाटक आणि गुजरात पोस्टल सर्कलमधील विविध पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या एकूण 4269 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 21 डिसेंबर 2020 पासून सुरू झाली/ आणि उमेदवार अधिकृत ग्रामीण डाक सेवक भरती पोर्टल, appost.in वर 20 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.

UPSC NDA (1) Exam 2021: 400 पदांसाठी अर्ज करता येणार-

केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी (UPSC ) नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीत 370 आणि भारतीय नौदल अकादमीतील 30 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अर्ज पोर्टलवर, upsconline.nic.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. एनडीए (1) परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज 19 जानेवारीपर्यंत केले जातील.

SBI SCO Recruitment 2020: स्टेट बँकेत स्पेशलिस्ट केडर ऑफिसरच्या 489 नोकर्‍या, 11 जानेवारीपर्यंत अर्ज करा-

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI ) सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, अभियंता आणि इतर विभागातील एकूण 489 पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदान केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे, sbi.co.in वर अर्ज करू शकतात. 22 डिसेंबर 2020 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 11 जानेवारी 2021 पर्यंत उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 95 सरकारी नोकर्‍या –

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (सीसीआयएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने वेगवेगळ्या पदांवर थेट भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार सीसीआयएलच्या अधिकृत वेबसाइट cotcorp.org.in या संकेतस्थळावर प्रदान केलेल्या ऑनलाइन अर्ज फॉर्मद्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 9 डिसेंबरपासून सुरू झालीय आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी 2021 आहे. Recruitment 2021 Notification

BARC Recruitment 2020: भाभा अणु संशोधन केंद्रात 105 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करा-

भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत भाभा अणु संशोधन केंद्रा (BARC) ने भौतिक, रसायन आणि जैविक विज्ञान क्षेत्रातील पात्र आणि उत्साही तरुणांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने 105 फेलोशिपची घोषणा केली. इच्छुक उमेदवार BARC च्या अधिकृत वेबसाइट, barc.gov.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. 15 जानेवारी 2021 रोजी ऑनलाईन अर्ज करता येतील.

SHS Bihar Recruitment 2021: 4102 स्टाफ नर्स पदांसाठी अर्ज करा-

राज्य आरोग्य समिती, बिहार यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्सच्या 4102 पदांवर कंत्राटी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. उमेदवार आधिकारिक वेबसाइट statehealthsocietybihar.org वर ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज आणि अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2021 निश्चित करण्यात आलीय.

हरियाणा पोलीस भरती 2021: हरियाणा पोलीस कॉन्स्टेबल भरती अधिसूचना 11 जानेवारीपासून 7289 पदांसाठी अर्ज-

हरियाणा कर्मचारी निवड आयोगाने (HSSC) 7289 पोलीस कॉन्स्टेबलच्या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. 11 जानेवारी 2021 रोजी अर्जाची प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत पोर्टल hssc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

OSSSC Recruitment 2020: 6432 नर्सिंग ऑफिसर पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा-

नर्सिंग ऑफिसरच्या 6432 पदांसाठी ओडिशा सरबोर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन (ओएसएसएससी) 5 जानेवारी रोजी उमेदवार नोंदणी आणि परीक्षा शुल्क सादर करू शकतात. त्याचबरोबर अंतिम अर्ज 12 जानेवारीपर्यंत सादर करता येईल.

JKSSB Recruitment 2021: जम्मू-काश्मीर सेवा निवड मंडळाच्या 550 पदांसाठी निघाली भरती-

जम्मू-काश्मीर सेवा निवड मंडळाने (JKSSB) विज्ञान आणि तंत्रज्ञान, एआरआय आणि प्रशिक्षण, कायदा न्याय आणि संसद आणि सार्वजनिक बांधकाम अशा एकूण 580 पदे भरती काढली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जानेवारी 2021 पर्यंत चालणार आहे. उमेदवार अधिकृत पोर्टल jkssb.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. Recruitment 2021 Notification

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com