Real Estate Agent Exam : ‘महारेरा’च्या परिक्षेत 96 टक्के रीअल इस्टेट एजंट पास; महिलांची निकालात बाजी

करिअरनामा ऑनलाईन । ‘महारेरा’ने बांधकाम व्यवसायातील (Real Estate Agent Exam) दलालांसाठी परीक्षा आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले असून ‘महारेरा’ने दलालांसाठी 20 मे रोजी पहिली परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत 96 टक्के उमेदवार पास झाले आहेत. या परीक्षेला 423 जण बसले होते; त्यापैकी 405 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
‘महारेरा’ कायद्यानुसार विकासक आणि स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. ही नोंदणी असेल तरच दलाल म्हणून काम करता येते. मोठया संख्येने ग्राहक दलालांच्या माध्यमातूनच घर खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. पण अनेक वेळा ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता (Real Estate Agent Exam) असते. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात दलाल म्हणून काम करण्यासाठी कोणतेही शिक्षण–प्रशिक्षण नाही. त्यामुळे कोणीही हा व्यवसाय करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या, या क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नसलेल्यांना रोखण्यासाठी ‘महारेरा’ने ‘महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र’ बंधनकारक केले आहे.

5 उमेदवारांना 90 टक्के गुण (Real Estate Agent Exam)
‘महारेरा’ने 10 जानेवारी 2023 च्या आदेशान्वये दलालांची नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक केले आहे. तसेच सुमारे 29 हजार जुन्या नोंदणीकृत दलालांनाही 1 सप्टेंबरपूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. ‘महारेरा’ने यासाठी अभ्यासक्रम तयार केला असून दलालांना प्रशिक्षण देऊन २० मे रोजी पहिली परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून 423 पैकी 405 एजंट उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेचा एकूण निकाल 96 टक्के लागला असून तब्बल 5 उमेदवारांनी 90 टक्के गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे.

60 वर्षांवरील 36 तर 70 वर्षांवरील 6 उमेदवार
405 पैकी 36 उमेदवार हे 60 वर्षांवरील आहेत. यातही 6 उमेदवार 70 वर्षांवरील असून या सर्वांनी 70 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुंबईतील (Real Estate Agent Exam) एस. एम. मालदे हे सर्वात ज्येष्ठ नागरिक असून ते 74 वर्षांचे आहेत. या परीक्षेत महिलांनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण 405 उमेदवारांत 37 महिला उमेदवारही आहेत. या परीक्षेत 90 टक्के गुण मिळविणाऱ्या पाच जणांमध्ये पुण्यातील गीता छाब्रिया यांचा समावेश आहेत. दरम्यान एजंटसाठी प्रशिक्षण, परीक्षा आणि त्याअनुषंगाने प्रमाणपत्र बंधनकारक करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव राज्य आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com