खुशखबर ! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९२६ पदांची भरती

करिअरनामा । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये मुंबई आणि नागपूर मिळून एकूण ४३२ रिक्त जागांचा समावेश आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२० आहे. सहाय्यक पदासाठी पदवी परीक्षेत किमान 50% गुणांसह कोणत्याही विषयात पदवी आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पदवीधर तरुणांनी  rbi.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – सहाय्यक

पद संख्या – ९२६ जागा

शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

फी – अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी / एक्सएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ५०/- व ओबीसी / जनरल / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रु. ४५०/- आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २३ डिसेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख -१६ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.