[Gk update] RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी मायकेल पात्रा यांची नियुक्ती

करीअरनामा । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे(RBI) डेप्युटी गव्हर्नर म्हणून केंद्र सरकारने मायकेल देबप्रता पात्रा यांची नियुक्ती केली आहे. ते सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत होते.

डेप्युटी गव्हर्नर पदाचा राजीनामा विराल आचार्य यांनी काही महिन्यांपूर्वी दिला होता. मायकेल पात्रा यांची त्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून ते तीन वर्षे काम करतील.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:-
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अन्य 3 डेप्युटी गव्हर्नर –
1) बीपी कानुंगो
2) एमके जैन
3) एनएस विश्वनाथन

आरबीआयचे 25 वे गव्हर्नर: शक्तीकांत दास
मुख्यालय: मुंबई;
स्थापना: 1 एप्रिल 1935, कोलकाता.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————-