Railway Recruitment : अरे व्वा !! रेल्वेकडून मोठी घोषणा!! एका वर्षात वेगाने भरणार सुमारे दिड लाख जागा

करिअरनामा ऑनलाईन । मोदी सरकारने रोजगार देण्याची मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारचे (Railway Recruitment) विविध विभाग आणि मंत्रालयांमधली रिक्त पदं भरण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मिशन मोडमध्ये भरती मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार आपल्या विविध विभागांमध्ये पुढील दीड वर्षात 10 लाख जणांची भरती करणार आहे; अशी घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता रेल्वे विभागात रिक्त असलेल्या जागांपैकी सुमारे दीड लाख जागा रेल्वेकडून भरण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे की ते पुढील एका वर्षात 1 लाख 48 हजार 463 रिक्त पदांची भरती करणार आहेत. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 8 वर्षांत रेल्वेने वार्षिक सरासरी 43 हजार 678 नोकऱ्या दिल्या आहेत.

रेल्वेमध्ये सुमारे 15 लाख पदे मंजूर आहेत. मार्च 2022 मध्ये, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी (Railway Recruitment) लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले होते की, रेल्वेमध्ये एकूण 2 लाख 98 हजार 428 पदे रिक्त आहेत. रेल्वेमध्ये प्रवेश स्तरावरील पदांसाठी 1 लाख 48,000 जागा रिक्त आहेत. प्रत्येक झोनमध्ये हजारो जागा रिक्त आहेत.

सरकारने या वर्षी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, एक मार्च 2020 च्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये तब्बल 8.72 लाख पदं रिक्त आहेत. केंद्र सरकारने 40 लाखांहून अधिक पदांना मंजुरी दिली आहे; मात्र प्रत्यक्षात 32 लाख कर्मचारीच कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून सरकार ही रिक्त पदं भरण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र त्यात फारसं यश मिळालेलं नाही. रेल्वेमध्ये अनुसूचित जातीची 4445, अनुसूचित जमातीची 4405 आणि ओबीसींची 5403 पदे रिक्त आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार, कायदा आणि न्याय या संसदीय समितीच्या 112 व्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

विविध विभागांमधील रिक्त जागा – (Railway Recruitment)

संरक्षण (सिव्हिल) विभागात 6.33 लाख कर्मचाऱ्यांची पदं मंजूर आहेत. तिथे 2.5 लाख पदं रिक्त आहेत. टपाल खात्यात 2.67 लाख पदं मंजूर असून, तब्बल 90 हजार पदं रिक्त आहेत. महसूल खात्यात 1.78 लाख पदं मंजूर असून, त्यापैकी 74 हजार पदं रिक्त आहेत.

गृह मंत्रालयांतर्गत 10.8 लाख मंजूर पदं आहेत. त्यापैकी 1.3 लाख पदं रिक्त आहेत. पीएमओच्या ट्विटचा संदर्भ देऊन गृह मंत्रालयांतर्गत येणारी रिक्त पदं तातडीने भरण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असं गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com