खूशखबर! रेल्वेकडून १ लाख ३० हजार पदांसाठी डिसेंबरमध्ये होणार परिक्षा

करिअरनामा ऑनलाईन। केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही नोकरीवर बंदी घालण्यात आली नसल्याचे केंद्र सरकारने आज जाहीर केले आहे. केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा एसएससी, युपीएससी, रेल्वे भारती अथवा पोस्ट भारती या नोकरीसाठीच्या परीक्षा या पूर्वी ठरलेल्या नियोजनाप्रमानेच घेण्यात येणार असल्याचे आज स्पष्ट झाले असून रेल्वेसाठीच्या १,४०,६४० रिक्त पदांसाठी नजीकच्या काळात होणार असून या लवकरच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.

अर्थ विभागाने ४ सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक हे पदांच्या निर्मितीसाठीच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग असून भरती प्रक्रियेशी त्याचा संबंध नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सध्या देशात सुरु असणाऱ्या कोरोना संकटामुळे देशावर आर्थिक संकट कोसळले आहे. गेल्या तिमाहीत जीडीपीत मोठी घट झाली आहे. या एकूण पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंत्रालय आणि संबंधित विभागांना अवास्तव असा खर्च टाळण्याचे बजावले आहे., तसेच मंत्रालयीन विभागातील कामकाजासाठी कागदाचा अनावश्यक वापरही बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे असले तरी नोकरभरती थांबविण्यात येणार नसल्याचे आज स्पष्ट करण्यात आले आहे.

हे पण वाचा -
1 of 6

भारतीय रेल्वेकडून रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे संचारबंदी लागू झाल्यामुळे संबंधित परीक्षा रद्द करण्यात आल्या होती तसेच पुढील तारखाही निश्चित नव्हत्या. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षा होणार की नाही? नोकरी मिळणार की नाही? अशा अनेक प्रश्नांनी उमेदवारांना ग्रासले असताना, डिसेंबर मध्ये परीक्षा घेणार असल्याचे आज सांगण्यात आले आहे. १५ डिसेंबर २०२० पासून रेल्वेच्या रिक्त जागांसाठी परीक्षा होणार असून १,४०,६४० जागांसाठी रेलेवेकडे तब्बल २.४२ कोटी अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या परीक्षा संगणकीकृत होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. रेल्वेने एनटीपीसीसाठी (तांत्रिक नसलेले, गार्ड, लिपिक,क्लार्क)३५,२०८ जागा, १६६३ मंत्रालयीन स्तरावरील जागा आणि १,०३,७६९ ट्रकमन, सफाई, पॉईंट मन यां जागांसाठी अर्ज मागविले होते. संचारबंदीच्या, तसेच सामजिक अलगाव च्या सर्व नियमांचे पालन करूनच परीक्षा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com