पुण्यातआज दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यांवर बंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे प्रतिनिधी | पुण्यात १४४ लागू आहे. पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शहरातील अनेक भागांत लोक रस्त्यांवरुन फिरताना दिसत आहेत. यापार्श्वभुमीवर पुण्यात दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यावर यायला बंदी घालण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाकडूनआज दुपारी तीन नंतर सर्व खाजगी वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे समजत आहे. याबाबतची एक महत्वाची मिटिंग सध्या सुरु असून लवकरच यावर निर्णय जाहीर होईल असे समजत आहे.

दरम्यान, आज सकाळपासून पुण्यातील रस्त्यांवर नागरिकांनी गर्दी केली होती. राज्यात जमावबंदी लागू असतानादेखील नागरिक बिंधास्तपणे रस्त्यांवरुन फिरताना दिसत होत्या. यामुळेच प्रशासनाकडून आता अशाप्रकारचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.