रखडलेली प्राध्यापक भरती लवकरच; सोबतच, तासिका प्राध्यापकांचे मानधनही वाढणार: शिक्षणमंत्री उदय सामंत

करिअरनामा ऑनलाईन | राज्यातील प्राध्यापकांची भरती अनेक वर्षापासून रखडलेली आहे. राज्यातील समितीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील मिळाला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर येत्या एक दोन दिवसात पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल. तसेच, तासिका प्राध्यपाकांच्या मानधनात वाढ केली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गोंदियामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

अनेक वर्षापासून प्राध्यापक भरती रखडली आहे. यातच, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापक भरती रखडली होती. मात्र आता तज्ज्ञ समितीने या प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. आता ती फाईल वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. येत्या दोन तीन दिवसात त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, असे उदय सामंत म्हणाले.

राज्यातील प्राध्यापक भरती लवकरच होण्याचा निर्णय झाला. तसेच, तासिका प्राध्यापकाच्या मानधनातही आता वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे तासिका तत्वावरील प्राध्यापकांची प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होणार आहे. तासिका तत्वावर कमी मानधन मिळते आणि ते वाढवून मिळावे अशी मागणी तासिका तत्वावरील प्राध्यापकांनी शासनाकडे केली होती. त्यावर तज्ञ समितीने निर्णय दिला आहे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com