Professional Scream Artist : ओरडून, किंचाळून पैसे कमावता येतात!! विश्वास बसत नाही ना?? पण ‘ही’ महिला किंचाळून कमावते ढीगभर पैसे

करिअरनामा ऑनलाईन । जोरजोरात होणारी भांडणं, ट्रॅफिकचा कर्णकर्कश आवाज, लहान (Professional Scream Artist) मुलांचं किंचाळणे हा गोंगाट तसा सहन करण्यापलीकडचा. लहान मुलांचं किंचाळणं बहुतांश पालकांची डोकेदुखी ठरतं. पण ओरडणं वा किंचाळणं हे Natural Talent असून याद्वारे तुम्ही भरघोस कमाई करू शकता असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण अ‍ॅश्ले पेल्डन ही महिला हॉरर चित्रपट व टीव्ही सीरिजमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून ओरडून, किंचाळून भरमसाठ पैसे कमवत आहे. जाणून घेऊया अ‍ॅश्ले नेमकं काय करते…

खरे तर अ‍ॅश्ले या एक व्यावसायिक स्क्रिम आर्टिस्ट (Professional Scream Artist) आहेत. अ‍ॅश्ले यांच्यासारखे कलाकार माइकसमोर अनेक तास भीतीदायक आवाज काढतात. या आवाजाला रेकॉर्ड करून हॉरर चित्रपटात किंवा टीव्ही सीरिजमध्ये बॅकग्राउंडला वापरलं जातं.

अ‍ॅश्ले यांना लहानपणी कळली आवाजातील जादू (Professional Scream Artist)

अ‍ॅश्ले पेल्डन यांच्यात किंचाळणं वा ओरडण्याची प्रतिभा जन्मतःच आहे. याचाच वापर करून त्या पैसे कमवत आहेत. वयाच्या ७ व्या वर्षी अ‍ॅश्ले यांना त्यांच्या कौशल्याबद्दल माहिती झालं. त्यावेळी त्यांना ‘चाइल्ड ऑफ अँगर’ नावाच्या चित्रपटात कामाची संधी मिळाली. या चित्रपटात ओरडणं व किंचाळण्याचे खूप सीन होते. आपल्या सुप्त कौशल्याबद्दल कळाल्यानंतर त्यांनी यावर लक्ष देणं सुरू केलं आणि त्याचवेळी त्या या क्षेत्राकडे वळाल्या. अ‍ॅश्ले यांनी ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कामाची तुलना स्टंट मॅनच्या कामाशी केली आहे.

‘या कामातून आनंद व समाधान मिळतं’

अ‍ॅश्ले पेल्डन गेल्या 20-25 वर्षांपासून या क्षेत्राशी जोडल्या गेल्या आहेत. आजवर 40 पेक्षा अधिक (Professional Scream Artist) चित्रपट व टीव्ही सीरिजमध्ये त्यांचा आवाज वापरला गेला आहे. या कामासाठी सरावाची गरज नसून, नैसर्गिक गुण असणारे लोक ते करू शकतात, असं त्या म्हणतात. अ‍ॅश्ले यांना 8 तासांपर्यंत ओरडणं, किंचाळण्याचं काम करावं लागतं. अनेकदा त्या थकतातही. पण या कामातून आनंद व समाधान मिळत असल्याचं अ‍ॅश्ले सांगतात.

एखादे हॉरर चित्रपट पाहण्यासाठी आपण चित्रपटगृहात गेल्यानंतर त्यातील ओरडणं व किंचाळण्याच्या आवाजाने आपण घाबरतो; पण हा आवाज एका व्यावसायिक स्क्रिम आर्टिस्टने दिलेला असतो. याद्वारे त्याने चांगली कमाईही केलेली असते. दरम्यान, आधुनिकतेच्या युगात नानाविध प्रकारची नवनवी क्षेत्रं निर्माण झाली आहेत. या क्षेत्रांबद्दल खूप कमी लोकांना माहिती (Professional Scream Artist) असेल; पण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रतिभेबद्दल त्याला स्वत:ला माहिती नसतं. याची वेळीच माहिती झाली आणि त्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच करिअर म्हणून त्याचा विचार होऊ शकतो, हे अ‍ॅश्ले यांच्या उदाहरणावरून दिसून येतं. त्यामुळं तुम्ही देखील वेळीच स्वतःमधील प्रतिभा ओळखा आणि अनोखं करिअर घडवा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com