[Gk update]  प्रसार भारतीचे “DD Retro” नवीन चॅनेल सुरू

करीअरनामा ।  भारताचे अग्रगण्य लोकप्रिय प्रसारक ‘प्रसार भारती’ यांनी “डीडी रेट्रो” नामक नवीन चॅनेल जारी केले आहे.  “डीडी रेट्रो” नवीन चॅनेल विशेषतः दूरदर्शनच्या जुन्या अभिजात कार्यक्रमांसाठी समर्पित केले जाईल.  ‘कोविद-19’ साथीमध्ये प्रेक्षकांना व्यस्त ठेवण्यासाठी प्रसार भारती यांनी  हे चॅनेल सुरू केले आहे.

कोविड  -19 च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर डीडी नॅशनलवर अनेक लोकप्रिय मालिका पुन्हा प्रसारित होऊ लागल्या आहेत,  ह्याच सर्व सारख्या मालिका डीडी रेट्रो वर प्रसारित होणार आहेत.

दूरदर्शनच्या या आवडत्या संस्मरणीय मालिकांमध्ये पौराणिक महाकाव्ये रामायण आणि महाभारत, ऐतिहासिक नाटक चाणक्य आणि सुपरहीरो मालिका शक्तिमान यांचा समावेश आहे.  या यादीत कॉमेडी नाटक श्रीमान श्रीमती, डिटेक्टिव्ह शो ब्योमकेश बक्षी, नाटक हम हैं ना आणि शाहरुख खानचा सर्कस देखील आहे.

या सर्व लोकप्रिय मालिका परत आल्यानंतर दूरदर्शन चॅनेल  इतर हिंदी भाषिक चॅनेल स्पर्ध्येमध्ये सर्वांना  मागे टाकत भारतातील सर्वाधिक पाहिले जात असलेले चॅनेल म्हणून पुढे आले आहे.

https://twitter.com/RetroDD/status/1249369477185015808?s=19

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-