MPSC परीक्षेत कराडचा प्रसाद राज्यात प्रथम; सोडली होती FIAT मधील नोकरी, वडील MSEB मध्ये कामाला

Get real time updates directly on you device, subscribe now.

कराड प्रतिनिधी । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कराड येथील प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत.

प्रसाद चौघुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनीरिंगची पदवी कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून घेतली आहे. तसेच प्रसाद याचे शालेय शिक्षण सातारा येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयातून झाले आहे. त्याचे वडील वीज वितरण कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करत आहेत तर आई हाऊस वाईफ आहे. प्रसाद याच्या निकालानंतर त्याच्या बनवडी येथील घरात अनेकांनी अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली आहे.

विशेष म्हणजे प्रसाद २०१७ साली कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून इंजिनीरिंग झाल्यानंतर पुणे येथे कंपनीत नोकरीला लागला होता. मात्र आपण अधिकारीच व्हायचे असे मनात ठरवून त्याने १ वर्ष नोकरी केल्यानंतर राजीनामा दिला आणि पूर्णवेळ स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली. त्यानंतर एकाच वर्षात त्याने एमपीएससी परीक्षेत यश मिळवले असून तो राज्यात प्रथम आला आहे.

एकूण 420 परीक्षार्थी यांची निवड यादी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्द केली आहे.13 जुलै ते 15 जुलै 2019 रोजी ह्या साठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये सातारा येथील चौगुले प्रसाद बसवेश्वर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. पूर्व परीक्षेला एकूण 3,60,990 विध्यार्थी बसले होते. यातून मुख्य परीक्षेला 6825 विध्यार्थी पात्र ठरले होते. आणि आज 420 यशस्वी विध्यार्थी हे अंतिम निवड यादी मध्ये पात्र ठरले आहेत.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com

हे पण वाचा -
1 of 56

हे पण वाचा –

एसटी कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, MPSC परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक

घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १५६४ जागांसाठी मेगा भरती

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय; राज्यमंत्री तनपुरे यांचा ATKT विद्यार्थ्यांनाही दिलासा

अखेर MPSC च्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ह्या दिवशी होणार परीक्षा

Get real time updates directly on you device, subscribe now.