राज्यातील शाळा पुन्हा बंद? कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यापार्श्वभुमीवर राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासन दरबारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत सोमवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे या जिल्ह्यांतील शाळा अद्याप सुरुच झालेल्या नाहीत. तसेच अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील शाळाही बंद आहेत. औरंगाबाद शहरातील शाळाही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता राज्यातील सर्वच शाळा पुन्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोमवारी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची पालकांसोबत बैठक आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे समजत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व शाळा 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्याता आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

हे पण वाचा -
1 of 30

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com