अराजपत्रीत पदांची भरती करण्यास MPSC कडून सकारात्मक प्रतिसाद

पुणे । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) शासनातील अराजपत्रीत भरतीची प्रक्रिया राबवण्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. यामुळे आता राज्य शासनाने लवकरच ही भरती प्रक्रिया राबविण्यास परवानगी देणे आवश्यक आहे.

अराजपत्रीत भरतीसाठी महापरीक्षा संकेतस्थळाची निर्मिती करून ऑनलाईन परीक्षा सुरु करण्यात आल्या होत्या, मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक गैरप्रकार उघडकीस आले. त्यामुळे अराजपत्रीत भरती प्रक्रिया अन्य कोणत्याही पद्धतीने न राबवता MPSC कडे सोपविण्याची उमेदवारांची मागणी होती. याबाबत MPSC कडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास तयार असल्याचे पत्राद्वारे 14 जुलैला कळविण्यात आले आहे.

राज्यशासनाने ही भरती प्रक्रिया MPSC कडे सोपविल्यास राज्यातील लाखो उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. तसेच ही भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची शक्यता वाढली आहे. MPSC कडून 2015 ला ही अराजपत्रीत पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास तयार असल्याचे कळविण्यात आले होते मात्र , त्यानंतरचा पाच वर्षात शासनाच्या स्तरावर कोणताही निर्णय न घेता खासगी संस्थांचा माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र आता सरकार बदल्यानंतर भरती प्रक्रिया MPSC कडून राबविण्यास राज्य शासनाने परवानगी देणे आवश्यक आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com