Police Bharti Syllabus 2022 : पोलीस भरती होणाऱ्या तरुणांसाठी इथे मिळेल संपूर्ण माहिती

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रियेला (Police Bharti Syllabus 2022) अखेर मुहूर्त मिळाला आहे. एकूण 17130 जागांवर पोलीस भरती होणार आहे. ही भरती पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या पदांसाठी होणार आहे. त्यानुसार तुम्ही देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेच्या पूर्ण अभ्यासक्रमाची माहिती देणार आहोत.

महत्वाचे म्हणजे या भरतीसाठी सुरवातीला मैदानी/शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सुरवातीला मैदानी किंवा शारीरिक चाचणीसाठी रिक्त पदाच्या 1:10 या प्रमाणत सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांना बोलावण्यात येईल. लेखी परिक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये नमुद केलेल्या दिनांकास परिक्षा सुरु होण्यापुर्वी परिक्षा केंद्रावर किमान दोन तास आधी उपस्थीत राहावे लागेल. सदरहु लेखी परिक्षा होण्यासाठी उमेदवारांस 40 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

लेखी चाचणीचा कालावधी – (Police Bharti Syllabus 2022)

लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल. ही परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. (Negative Mark सिस्टीम असणार नाहीत.)

भरतीचे 2 टप्पे

महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा.

1. शारीरिक चाचणी

पोलीस शिपाई :

शारीरिक चाचणी :

  • पुरुष :

1600 मीटर धावणे : 20 गुण
100 मीटर धावणे : 15 गुण
गोळाफेक : 15 गुण (Police Bharti Syllabus 2022)
एकूण गुण : 50 गुण

  • महिला :

800 मीटर धावणे : 20 गुण
100 मीटर धावणे : 15 गुण
गोळाफेक : 15 गुण
एकूण गुण : 50 गुण

चालक पोलीस शिपाई :

चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल.

  • पुरुष उमेदवार :

1600 मीटर धावणे : 30 गुण
गोळाफेक : 20 गुण
एकूण गुण : 50 गुण

  • महिला उमेदवार :

800 मीटर धावणे : 30 गुण
गोळाफेक : 20 गुण
एकूण गुण : 50 गुण

  • पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणी :

शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. (Police Bharti Syllabus 2022)

कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :
(अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी : २५ गुण
(ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी : २५ गुण
कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.

लेखी चाचणी:

  • पोलीस शिपाई पदाकरीता :

शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील.उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:
१) अंकगणित; (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी; (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
३) बुध्दीमत्ता चाचणी; (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
४) मराठी व्याकरण (एकूण प्रश्न 25, एकूण गुण 25)
एकूण 100 गुण, परीक्षा कालावधी 90 मिनिट

  • चालक पोलीस शिपाई पदाकरीता :

शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी (Police Bharti Syllabus 2022) उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :
१) अंकगणित
२) सामान्यज्ञान व चालू घडामोडी
३) बुध्दीमत्ता चाचणी
४) मराठी व्याकरण आणि
५) मोटार वाहन चालविणे / वाहतुकीबाबतचे नियम
एकूण 100 गुण, परीक्षा कालावधी 90 मिनिट

विषय : गणित
महत्वाचे घटक : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे.

विषय : बौद्धिक चाचणी
महत्वाचे घटक : क्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन.

विषय : मराठी व्याकरण
महत्वाचे घटक : मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक (Police Bharti Syllabus 2022)

विषय : सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
महत्वाचे घटक : इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com