पोलीस भरती प्रक्रियेमध्ये होणारमोठा बदल, तरुणांना मिळणार दिलासा!

पोटापाण्याची गोष्ट | पोलीस भरती साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे, राज्य शासन काही महत्वपूर्ण निर्णय घेणार असून निवड चाचणीमधील पद्धतीमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. निवड प्रक्रियेमधील लांबलचक पद्धत टाळून आधी लेखी परीक्षा आणि मग शारीरिक चाचणीचा निर्णय काही दिवसांपूर्वी शासनाने घेतला होता.

शारीरिक चाचणीसाठी बंधनकारक असलेली लांबउडी आणि पूल अप्स मैदानी चाचणी मधून वगळण्यात येणार असल्याचे समजत आहे आणि मैदानावर घेण्यात येणारी चाचणी १०० ऐवजी ५० गुणांची होणार आहे. यासाठी पुरुषांना १६०० मिटर धावणे ३० गुण, गोळा फेक १० गुण आणि महिलांना ८०० मीटर धावणे ३० गुण गोळा फेक १० गुण आणि इतर एका मैदानी प्रकारा मध्ये १० गुण असे बदल होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शासनाने हे बदल केले तर उमेदारांचे मैदानातील त्रास कमी होईल आणि मैदानी परीक्षा आणखी सोप्पी होईल आणि त्यासोबतच पोलीस प्रशासनाचे वेळ वाचणार आहे.

इतर महत्वाचे –

गोंडवाना विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती

राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !

राष्ट्रीय आरोग्य अभियानात २४८ पदांसाठी भरती – ३० जुलै शेवट शेवटची तारीख !

आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2019 – 1200 पदांसाठी भरती

भारत पेट्रोलियम मध्ये १८ जागांसाठी भरती | Bharat Petroleum Recruitment 2019

केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट अप’ योजना!

नवोदय विद्यालय समिती मध्ये मेगा भरती