Police Bharti 2022 : पोलीस भरतीसाठी ‘अशी’ असेल मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा; वाचा सविस्तर…

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे. वेगाने (Police Bharti 2022) बदलणाऱ्या राजकीय वातावरणात राज्य सरकारकडून तरुणांसाठी आणि पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात तब्बल 7231 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या पोलीस भरतीसाठी मैदानी आणि लेखी परीक्षा कशी असणार याविषयी…

हे पण वाचा -
1 of 23

शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी (Police Bharti 2022) परीक्षा घेतली जाणार आहे अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या भरतीसाठी सुरवातीला परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यांनतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

अशी असणार शारीरिक चाचणी आणि गुण – (Police Bharti 2022)

 • पोलीस शिपाई पदासाठी पुरुष आणि महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे.

पुरुष उमेदवार –

 1. 1600 मीटर धावणे – 20 गुण
 2. 100 मीटर धावणे – 15 गुण
 3. गोळाफेक – 15 गुण

एकूण – 50 गुण

महिला उमेदवार – (Police Bharti 2022)

 1. 800 मीटर धावणे – 20 गुण
 2. 100 मीटर धावणे – 15 गुण
 3. गोळाफेक – 15 गुण

एकूण 50 गुण

अशी असेल लेखी परीक्षा –

 • पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील.
 • लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. (Police Bharti 2022)
 • परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल.
 • लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल.
 • उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
 • लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
 • पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

राज्य राखीव पोलीस बल शारीरिक चाचणी –

राज्य राखीव पोलीस बलाच्या सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदाच्या भरतीसाठी एकूण 100 गुणांची (Police Bharti 2022) शारीरिक चाचणी होणार आहे.

पुरुष उमेदवारासाठी –

 1. 5 कि.मी. धावणे – 50 गुण
 2. 100 मीटर धावणे – 25 गुण
 3. गोळाफेक – 25 गुण

एकूण – 100 गुण

 • महत्त्वाचे – शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार पदानुसार 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असणार आहेत. यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com